सामान्यांना रुग्णसेवा दिलेल्या बार्शीच्या डॉ. कश्यपी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : सामान्यांना रुग्णसेवा दिलेल्या बार्शीच्या डॉ.कश्यपी!

बार्शी : जुन्या पिढीतील महिला डॉक्टर स्वाती कश्यपी यांचे नुकतेच निधन झाले. श्री भगवंत पंच कमिटीचे सरपंच डॉ. दत्तात्रय कश्यपी या पती-पत्नींनी शहरातील चाटे गल्ली येथे अतिशय अल्पदरात रुग्णालय उभा करुन सेवा केली. पती-पत्नी काळाच्या पडद्याआड गेले, तरी त्यांच्या स्मृती जागृत असून बार्शीकर जनता कधीच विसरु शकत नाही.

डॉ. द. ग. कश्यपी (अण्णा) आणि डॉ. स्वाती कश्यपी यांची वैद्यकीय सेवा अनेक रूग्‍णांनी अनुभवली आहे. आजारी पडल्यानंतर रुग्ण डॉ. कश्यपी यांच्या दवाखान्यात जात तेव्हा काही गोळ्या अन इंजेक्शन घेऊनच बाहेर पडे, बहुदा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी रुग्ण तरतरीत दिसून आपल्या कामात व्यस्त होत.

उपचारानंतर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ खूप कमी वेळा येत असे बोलत बोलत इंजक्शन देणं आणि यासोबत तुम्हाला काहीही झालेलं नाही, असे रुग्णाला आत्मविश्वास देणारं वाक्य अशी डॉ.स्वाती कश्यपी यांची मूर्ती आजही डोळ्यासमोर उभी राहते.

डॉक्टरांसोबत सतत असणाऱ्या शिवाय कमालीची शिस्त व आवश्यक तेवढेच संवाद करणाऱ्या डॉ. स्वाती कश्यपी कोणत्याही इतर तपासण्या करीत नसत. त्यामुळे महिला रुग्णांची गर्दी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असत त्यांचा सेवाभाव,रुग्ण हाताळण्याची पद्धत आपलेसे करणारी होती.

डॉ.स्वातीताई यांच्या स्वभावात कडक व मृदुपणा असं दोन्हीही होत पण त्याहीपेक्षा अतिशय मनोभावे डॉ.अण्णांना साथ देताना दिसल्या अण्णा यांना जाऊन बरीच वर्षे झाली जगण्याच्या रथाचं एक चाक निखळून पडलं असतानाही स्वातीताईंनी हा रथ पुढं ओढत राहिल्या मात्र मुलगा डॉ.भालचंद्र कश्यपी यांना डॉ.पती-पत्नींनी उभा केलं आणि नामवंत डॉक्टर म्हणून त्यांनीही आपली ओळख निर्माण केली. 

गेले काही दिवस जुन्या पिढीतील खूप महत्वाच्या व्यक्ती दिवंगत झाल्या आहेत जाणाऱ्या प्रत्येकडून घेण्यासारखं खूप काही होतं पिढीतील प्रत्येकाला ज्ञात असलेल्या डॉ. स्वातीताईचंही निधन होताच अनेकांनी आपले वेगवेगळे अनुभव सांगितले.

डॉ.स्वाती कश्यपी नव्या पिढीला फारशा परिचित नसल्यातरी १९८५ ते १९९५ कालखंडामधील प्रत्येकजण त्यांना ओळखते. कडक शिस्त, शुद्ध मराठी भाषा बोलणाऱ्या डॉ. स्वाती काही वर्षांपासून वैद्यकीय सेवेतून निवृत्त होऊन सामान्य जीवन जगत होत्या.

जुन्या पिढीतील कर्तत्ववान डॉ. स्वाती कश्यपी यांच निधन झाले पण त्यांच्या स्मृती आजही अनेक रुग्णांच्या ह्दयात घर करुन आहेत असे डॉक्टर यापुढेही निर्माण व्हावेत अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.

Web Title: Solapur Dr Barshi Gave Patient Care Common People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..