सोलापूर : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मातृशोक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरिजाबाई विठोबा भरणे

Pune : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक

वालचंदनगर : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरिजाबाई विठोबा भरणे (वय - ८३) यांचे वृद्धापकाळाने आज शुक्रवार ता. 1 रोजी निधन झाले आहे.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे गाव इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी आहे. त्यांच्या आईला गिरिजाबाई उर्फ जिजी या नावाने ओळखले जात होते. त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड होती. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा यांचे गेल्या दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गिरिजाबाई यांच्या पश्चात रामचंद,आबासाहेब,मधुकर व दत्तात्रय ही चार मुले तर साळुबाई,कुसुम व हिराबाई अशा तीन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे.गिरिजाबाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारी २ वाजता भरणेवाडी येथील निवासस्थानानजिक त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Web Title: Solapur Former Minister Dattatraya Bharane Girijabai Vithoba Died Bharane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top