
Dada Bhuse News: मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समितीच्या निर्णयानंतर छावणी चालकाचे अनुदान ;मंत्री भुसे
मंगळवेढा : मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांच्या थकीत 38 कोटी देयकाच्या संदर्भात जे ऑनलाईन ला उपलब्ध आहे. व त्या काळातील रेकॉर्डवर आहे त्याप्रमाणे अनुदान अदा करण्यात येईल.
दरम्यान मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीचा निर्णय आल्यानंतर निधी उपलब्ध करण्यात येईल
असे उत्तर कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या सत्रात माजी मंत्री महादेव जानकर व आ.भाई जयंत पाटील यांनी उपस्थितीत केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले दिले.
विधान परिषदेमध्ये शेकाप चे आ.भाई जयंत पाटील व आ. महादेव जानकर यांनी माण, खटाव, फलटण, सांगोला,मंगळवेढा या तालुक्यात दुष्काळात सुरू करण्यात आलेल्या जनावराचा जनावराच्या छावणीची देयके थकीत असल्याचा मुद्दा आज लक्षवेध्वारे उपस्थित केला.
शेकाप चे शेकापच्या जयंत पाटील यांनी ऑनलाईन हजेरी पत्रिकातील बिघाडाचा मुद्दा उपस्थित केला तर महादेव जानकर यांनी आठवड्यातून एकदा एकाच दिवशी ऑनलाइन हजेरी घेण्याचा नियम असताना अधिकाऱ्याने हा नियम दररोज लावला होता.
बाबत शासन निर्णय देखील पारित करण्यात आला होता या छावण्याची दैनिक तपासणी 7 जणांच्या पथकावर जबाबदारी निश्चित करण्यात आली.
छावणी चालकाकडून पशुपालकांना देण्यात आलेल्या सुविधा योग्य आहेत का ? आहार वेळेवर दिला जातो का? पिण्याची पाणी व इथून सुविधाची तपासणी करण्याची अधिकार देण्यात आले होते मात्र छावण्या सुरू झाल्यानंतर तब्बल उशिरा प्रशासनाने बंद करण्याच्या वेळी दंडाच्या नोटिसा देताना त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नाही.
छावणी चालकावर दंडाची कारवाईस पात्र असेल तर तपासणी करून शासकीय अधिकाऱ्याला वाचवून छावणीधारकाला बळी देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. त्यांनी दिलेला खुलासा अमान्य करून दंडाची रक्कम कायम ठेवली.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील या छावणीच्या थकीत बिलासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील या छावणीचालकांनी तालुकास्तरावरून ते मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला
मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या देयकासाठी तरतूद केली नाही आता परत राज्यात सत्ता बदलल्यानंतर या छावणी चालकानी थकीत बिलासाठी प्रयत्न सुरू केला.
4 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या छावणी चालकांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार असल्याचा शब्द दिला. मात्र अद्यापही त्यांच्या थकीत देयके मिळाली नाहीत.
म्हणून या प्रश्नावर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखेनी वेळ दिला नाही.
यावरून झालेल्या वादावादी प्रकरणात जनहितचे अध्यक्ष देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला यावरून छावणी चालकाच्या प्रश्नांची तीव्रता जिल्ह्यात गतिमान झाली.आ महादेव जानकर व शेकापचे आ जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला