सोलापूर : भव्य रांगोळीतून बाळासाहेबांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : भव्य रांगोळीतून बाळासाहेबांना अभिवादन

सोलापूर : भव्य रांगोळीतून बाळासाहेबांना अभिवादन

सोलापूर : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहर शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने शिवसेना भवनात १६ फूट बाय १८ फूट साकारण्यात आलेल्या रांगोळीतून अभिवादन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे पूजन विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख गेणाश वानकर, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबुराव गोमे, प्रताप चव्हाण, भिमाशंकर म्हेत्रे, विठ्ठल वानकर, लहू गायकवाड, सुरेश जगताप, शिवा ढोकळे, दीपक दुधाने, सुनिल यादव, ब्रह्मदेव गायकवाड, विजय पुकाळे, दत्ता खलाटे उपस्थित होते.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

सोलापुरातील कलावंत सिद्धाराम नालवार, प्रेम सागर आडके आणि कुमारी सायली घंटे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, टॉफी, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. स्व.बाळासाहेब ठाकरे यांना १६ फूट बाय १८ फूट साईज रांगोळीच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले. ४० तास परिश्रम घेऊन आणि १६ प्रकारचे रंग वापरून बाळासाहेबांची रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश जगताप, संजय साळुंखे, विजय मोटे, रोहित अक्‍कलकोटे, मल्लिनाथ एनपे, बबलु खरात, लखन डिगे, रितेश मार्गम, उज्ज्वल दीक्षित, गणेश गडवणे, तुषार आवताडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय साळुखे यांनी केले.

loading image
go to top