सोलापूर : हापूसचे अर्थकारण कोलमडले

अवकाळी, भेसळीचा फटका; केसरने सावरला बाजार
mango
mangosakal

सोलापूर : अवकाळीचा फटका, कर्नाटक हापूसचा धुडगूस यामुळे यावर्षी आंब्याच्या हंगामाला मोठा आर्थिक फटका बसला. कर्नाटक हापूसच्या भेसळीने देवगड व रत्नागिरीच्या हापूसचे अर्थकारण अक्षरशः कोलमडले. मागील वर्षीच्या तुलनेत आंब्याच्या हंगामात फारशी उलाढाल होऊ शकली नाही.

यावर्षी आंब्याच्या हंगामाला अगदी सुरवातीलाच अवकाळीचा फटका बसला. डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान झालेल्या अवकाळीने महाराष्ट्रातील हापूसचे चांगलेच नुकसान झाले. त्यानंतर काही प्रमाणात मालाची आवक देखील कमी झाली. नंतर देवगड व रत्नागिरीचा हापूस वेळेत येण्यास सुरवात झाली. पण सुरवातीपासून त्यात कर्नाटक हापूसची भेसळ सुरु झाली. देवगडच्या पॅंकिग तयार करून मोठ्या प्रमाणात त्यात कर्नाटक हापूस विकला गेला. हा प्रकार इतका जोरात सुरू होता की, त्यावरून समाज माध्यमावर देवगडचे हापूस आंबे एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्याचे देवगडच्या नागरिकांनाही माहिती नाही, असे संदेश दिले जाऊ लागले. याचा अर्थ देवगड हापूसच्या नावाखाली चक्क कर्नाटक हापूस मोठ्या प्रमाणात विकला गेला.

सीमाभागात कर्नाटक हापूसची आवक यावर्षी भरपूरच होती. पण भेसळीमुळे त्याची मागणी वाढून भाव देखील चक्क १०० रुपयांवरून ३०० रुपयांवर पोहोचला. स्त्यारस्त्यावर देवगड हापूसची विक्री होत होती. विशेष म्हणजे या भेसळीवर बाजार समितीकडून कोणतीच कारवाई झाली नाही. या भेसळीसाठी रत्नागिरीतून पेपरची रद्दी आणण्याचे प्रकार झाले. सुरवातीला हापूसचा भाव २५०० रुपये होता तो नंतर ५०० रुपयापर्यंत कमी झाला. त्या खालोखाल केशरचे भाव मात्र शेवटपर्यंत १०० ते १२५ रुपये किलोपर्यंत कायम राहिले. आता मात्र हे भाव घसरले आहेत.

गावरान आंबा नगण्यच

यावर्षी बाजारात गावरान आंब्याची आवक नगण्यच होती. दिवसेंदिवस आंब्याची आवक कमी होणे म्हणजे आंब्याची वाढलेली वृक्षतोड हे कारण गंभीर मानले जाते. पण त्यासोबत लोणच्याची कैरी देखील कमी झाली आहे. अनेक शेतकरी आंबा पिकवण्याऐवजी कैरी चांगल्या भावात किरकोळ विक्री करून लाभ करून घेतला. त्यामुळे आंब्यात घटच झाली.

यावर्षी हापूसच्या बाबतीत अवकाळीने आवक कमी झाली. तसेच मालाची गुणवत्ता देखील घसरली. तसेच आवक मर्यादीत असल्याने उलाढाल देखील कमी झाली.

- धिरेन गाढा,भकालो फळ विक्रेता, सोलापूर

ठळक बाबी

अवकाळी पावसाने हापूसची आवक कमी

कर्नाटक हापूसची देवगड नावाने सर्रास विक्री

अती भेसळीने कर्नाटक हापूसच्या दरात वाढ

थेट कोकणातून माल आणणाऱ्या व्यापारांनी विकला मूळ हापूस

केसरचे भाव बऱ्यापैकी स्थीर

गावरान आंबा नगण्यच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com