सोलापूर : डंपर बस चा भीषण अपघात -15 जखमी

कुर्डुवाडी पंढरपूर रोडवरील कूर्डूहद्दीतील घटना
Solapur Kurduwadi Pandharpur Road truck bus accident 15 injured
Solapur Kurduwadi Pandharpur Road truck bus accident 15 injuredsakal

कुर्डू - कुर्डू पंढरपूर रोडवरील डंपर व बस च्या अपघातामध्ये सुमारे 15 जण जखमी झाल्याची घटना रविवारी 12जुन रोजी सकाळी अकरा सुमारास घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.बस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बस मधील 76प्रवाशांचे प्राण बालंबाल बचावले.

मिरज डेपोची MH 06 S 8371या क्रमांकाची मिरज - माजलगाव ही बस कुर्डुवाडी कडे जात असताना कुर्डूहद्दीतील आदिशक्ती मंगल कार्यालयाजवळ आली असता शेजारीच क्रॉक्रीट मिक्स प्लांट मधुन MH 45T 1055 या क्रमांकाचा डंपर मेन रोडवर अचानक आलेल्याने बसची‌ डंपरला पाठीमागून जोराची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती बसची माहिती बसचे वाहक व प्रवाशांची दिली. या बसमधील 76 प्रवशांचा जीव बालंबाल बचावला.

मातीच्या ढिगार्‍याने मुळे 76प्रवाशांना जीवदान.

कुर्डुवाडी कडे जाणाऱ्या बसला आचानक डंपर रोडवर आल्याने बस डाव्या बाजूला असणाऱ्या माती च्या मोठ्या ढीगाऱ्यामुळे सुमारे पंधरा फुट खड्यात कोसळली असती .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com