Solapur News : खर्चाच्या आकडेवरून ग्रामपंचायत निकाल धक्कादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Gram Panchayat elections, Solapur News

Solapur News: खर्चाच्या आकडेवरून ग्रामपंचायत निकाल धक्कादायक

मंगळवेढा : तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीचा निकाल काल जाहीर झाला. हा निकाल तालुक्यातील राज्यकर्त्याबरोबर,आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतच्या निवडणूक लढवण्यासाठी 16 गावात सत्तेसाठी निवडणुकीत केलेल्या खर्चाच्या आकडेवारीवरून धक्कादायक मानला जात आहे. ग्रामपंचायत स्थितीत एवढा खर्च केला तर इतर निवडणुकांची काय परिस्थिती यावर तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या.(Solapur News)

कालच्या निकालामध्ये गुंजेगाव,मारापुर, ढवळस या नदीकाठच्या गावाबरोबर डोंगरगाव, खोमनाळ, तळसंगी, भालेवाडी, या उजनी कालव्याच्या क्षेत्रातील गावाने गावगाड्यात सत्तेसाठी स्वखर्चाबरोबर तालुकास्तरीय नेत्यांच्या नेत्यांच्या मदतीने निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला.नदी व कालवा क्षेत्रामध्ये बागायत पट्ट्यामुळे उत्पन्नाचे साधन निर्माण झाल्यामुळे निवडणूक खर्चासाठी खिशातील रकमेचा हात दिला सोडला मात्र याच्या तुलनेतही दुष्काळी पट्ट्यात असलेले गोणेवाडी पाटकळ हाजापूर शिरनांदगी मारोळी येड्राव पौट बावची ,सोड्डी या गावात देखील निवडणूक खर्च मोठ्या प्रमाणात केला आहे.

रहाटेवाडी व फटेवाडी येथील गावपातळी नेते निवडणूक बिनविरोध करून शहाणे निघाले असे म्हणायला काही हरकत नाही. सत्तेसाठी विजयी व पराभूत झालेल्या उमेदवारांनी केलेल्या खर्चाची आकडेवारी चिंताजनक असली तरी अलीकडच्या काळात थेट निधीमुळं मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्यामुळे सत्तेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला.तो खर्च पुढील पाच वर्षात विकासकामातील टक्केवारीतून निवडणुकीतील खर्च वसूल करणार का? आज अशी प्रवृत्ती राहिली तर होणारी कामे गुणवत्तापूर्ण होणार का? शिवाय नव्या विकास कामाची अपेक्षा कशी करायची असा प्रश्न निर्माण होतो

त्यामुळे या पुढील काळातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जि. प. व पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार करता यापुढील निवडणुका लढवाव्यात की नाहीत असा प्रश्न आगामी निवडणूक लढविणाय्रा समोर उभा आहे.मात्र गावातील सत्तेच्या श्रेयासाठी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण केली या निवडणुकीत कारखाना निवडणुकीत तयार झालेल्या समविचारी गटाचा प्रभाव दिसून आला समविचारी निवडणुकीच्या निवडणुकीतून दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांचे नेतृत्व तालुक्यात नव्याने तयार झाले त्याच्या बरोबरीने उपाध्यक्ष तानाजी खरात यांची देखील मदत काही गावात घ्यावी लागली अशा तऱ्हेने तालुक्यामध्ये निवडणुकीत यश मिळाले.

आ.समाधान आवताडे गटाने देखील तालुक्यामध्ये अपेक्षित यश मिळवले त्यांना बावची ग्रामपंचायत गमावावी लागली.तर मारापूर नव्याने तब्यात आली.या ठिकाणी दामाजीच्या निवडणुकीत पराभूत झालेले विनायक यादव हे सरपंचाच्या निवडणुकीत जिंकले. पाटकळ येथे ऋतुराज बिले याने सरपंच पद व तीन सदस्य मिळाले होते. सरपंच पदासह सत्ता मिळवले गाव गाड्यांमध्ये शिवानंद पाटील(तळसंगी), सचिन शिवशरण(भालेवाडी, काशिनाथ पाटील(येड्राव),रामेश्वर मासाळ(गोणेवाडी), गुलाब थोरबोले(शिरनांदगी),बसवराज पाटील(मारोळी), यांना पाच वर्षात लोकांची केलेली कामे व सार्वजनिक विकास कामे यामुळे आपले गाव ताब्यात ठेवता आले मात्र यादप्पा माळी यांनी सोड्डीत सत्ता मिळवली असली तरी सरपंच पद मिळवत आले नाही.

पौट येथे हरिदास हिप्परकर या नवख्या तरुणांनी गावची सत्ता हस्तगत केली. कोणतेही सत्ताचक्र हातात नसताना भगीरथ भालके यांना ग्रामपंचायतीत यश देखील आगामी वाटचालीसाठी उत्साहित करणारे ठरले. आ. अवताडे आणि परिचारक यांच्या कार्यकर्त्याचा विचार केलास या ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या ग्रामपंचायत सर्वाधिक दिसून येतात. परंतु पक्षापेक्षा नेत्यांचे गट्स अधिक असल्यामुळे सोयीच्या राजकारणामुळे ग्रामपंचायतीवरील सत्ता कोणाची हे सांगायला अनेकांची गोची झाली 18 ग्रामपंचायतीमधील निकाल पाहिला आ. समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, भगीरथ भालके व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांना कही खुशी कही गम असा ठरला. कारण गावपातळीवरील नेत्यांनी सर्वच नेत्यांना हाय हाय केले आहे.