सोलापूर : माहेरून दहा लाख आण म्हणून विवाहितेचा छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेचा छळ

सोलापूर : माहेरून दहा लाख आण म्हणून विवाहितेचा छळ

सोलापूर : लॉकडाउनमध्ये व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे. मला व्यवसायासाठी माहेरून दहा लाख रुपये आण म्हणून पतीने छळ केल्याची फिर्याद फरजाना अब्दुल खुदबोद्दीन तांबोळी (रा. सिद्धेश्वर नगर भाग- पाच) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. ६ डिसेंबर २०१३ रोजी फरजाना यांचा अब्दुल याच्याशी विवाह झाला. विवाहानंतर सातत्याने त्याने छळ केला. पण, कोरोना काळात व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने त्याने माहेरून पैसे आण म्हणून त्रास दिला. दरम्यान, पतीने माझ्या संमतीशिवाय दुसऱ्या महिलेशी विवाह केला.

याबद्दल त्याच्याकडे विचारणा केली, तर तुला माझ्यासोबत नांदायचे असेल तर राहा, नाहीतर निघून जा, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तू आमच्या दोघांमध्ये आलीस तर तुला सोडणार नाही, अशी दमदाटी केल्याचेही फरजाना यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार अब्दुल कय्युम खुदबोद्दीन तांबोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक मुजावर हे तपास करीत आहेत

Web Title: Solapur Marriage Ten Lakhs Maher

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top