
Solapur Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ५५ वर्षीय आरोपीला सक्तमजुरी
Solapur Crime News : दहा रुपये देतो म्हणून अल्पवयीन पीडितेला शाळेतून घरी नेऊन देवेंद्र शांतप्पा नागुरे (रा. अक्कलकोट) याने अत्याचार केला. या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी आरोपीला तीन वर्षाची सक्तमजुरी व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली
दरम्यान, पीडिता २८ डिसेंबर २०१५ रोजी शाळेत गेली होती. दुपारच्या जेवणाच्या सुटीत आरोपी देवेंद्र नागुरे त्याठिकाणी आला. त्याने दहा रुपयाचे अमिष देऊन त्या अल्पवयीन सोबत घेऊन घरी आला. त्यानंतर तिच्या मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य करू लागला. त्यावेळी पीडिता घाबरली आणि दहा रुपये तेथेच टाकून पळून गेली.
हा प्रकार तिने रात्री आई-वडिल घरी आल्यावर त्यांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या वडिलाने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तपासाअंती दोषारोपत्रक न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणाच्या सुनावणीवेळी पीडिता, तिचे आई-वडिल, पंच व तपासी अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. प्रकाश जन्नू यांनी युक्तीवाद केला.
न्यायालयाने त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असेही आदेश दिले.
या प्रकरणात सरकारतर्फे सहायक सरकारी वकिल प्रकाश जन्नू, ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ॲड. पी. बी. लोंढे-पाटील यांनी काम पाहिले. कोर्टपैरवी म्हणून अजित सुरवसे यांनी मदत केली.
आईला मराठी येत नसल्याने दुभाषिकाची मदत
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या खटल्यात त्या पीडितेच्या आईची देखील साक्ष महत्त्वाची होती. पण, तिला मराठी भाषा बोलता येत नव्हती, फक्त कन्नडच येत होते.
अशावेळी न्यायालयाने दुभाषक घेऊन त्यांची साक्ष नोंदवली. आरोपी देवेंद्र नागुरे याला शिक्षा व्हायला पीडितेच्या आईची साक्ष या प्रकरणात खूप महत्त्वाची ठरली.