Solapur News : आजपासून आ.समाधान आवताडेचा गावभेट दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Samadhan avtade

सोलापूर : आजपासून आ.समाधान आवताडेचा गावभेट दौरा

मंगळवेढा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने निर्बंध शिथिल केले, गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय पातळीवरील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार समाधान आवताडे हे आजपासून ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर आहेत. त्यामुळे गेली दोन वर्ष ग्रामीण भागातील जनतेचे तुंबलेले प्रश्न या गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून समोर येणार आहेत.

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले विविध नियम आणि निर्बंध घातले. याच सावटात स्व. आ भारत भालके यांचे निधन झाले. त्यानंतर सहा महिन्यात पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक 17 एप्रिल 2021 ला झाली. निकालानंतर आ.आवताडेनी कोरोनामुळे गाव भेट दौरा केला नव्हता मात्र गत महिन्यात शासनाने कोरोनावरील निर्बंध शिथिल केले. प्रशासकीय पातळीवर ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे परंतु कोरोनाच्या नावाखाली अनेक शासकीय कार्यालयात ग्रामीण जनतेला आपला खिसा रिकामा करावा लागला.

नागरिकांना यामुळे तालुक्यातील नागरिकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागला आहे.सध्या ग्रामीण भागात विजेच्या भारनियमनाचा प्रश्न गंभीर असून याशिवाय कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यामुळे मजुरांना रोजगार हमीच्या माध्यमातून कामे उपलब्ध होण्याच्या गरज आहे. तालुक्यातील आरोग्य सुविधा देखील सक्षम करताना आमदाराच्या सूचनेनंतर उपकेंद्र स्तरावर ओपीडीत सुरुवात झाली की नाही याचा आढावा देखील यानिमित्ताने घेणे आवश्यक आहे सार्वजनिक बांधकाम व जि. प. बांधकाम यांच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांची दुरवस्था गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही श्रावण बाळ योजनेसाठी 2002 ते 07 या कालावधीत जुन्याच यादीचा आधार घेतला जात असल्यामुळे या लाभासाठी नविन लाभार्थी वंचित आहेत.

ग्रामीण भागासाठी नियुक्त गावपातळीवरील कर्मचारी हे मंगळवेढ्यात बसूनच अनेक गावाचा कारभार करीत आहेत. दिवस नेमून मुख्यालयातून शासकीय सेवेचा लाभ देण्याची मागणी देखील या निमित्ताने होत आहे पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत बंद पाणी योजनेचेसाठी घेतलेल्या बैठकीनंतर देखील शासकीय पातळीवरील उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे गेली दीड वर्षे तुंबलेले प्रश्न या गाव भेट दौय्रातून समोर येणार आहेत मात्र आ. अवताडे याप्रश्नी आक्रमक होणार शासकीय यंत्रणेच्या पाठीशी उभे राहणार हे या दौर्‍यातून स्पष्ट होणार आहे.

या दौय्रात दि.21 एप्रिल रोजी दु.4 वाजता देगांव, 4.30 वा. शरदनगर, 5 वा ढवळस आणि 5.30 वा धर्मगांव असा कार्यक्रम असणार आहे.उद्या शुक्रवार, स. 8 मुंढेवाडी, 8.30 वा. रहाटेवाडी, 9.30 वा. बोराळे, 10 वा नंदुर, 10.30 वा. अरळी, 11 वा सिद्धापूर, 11.30 वा. तांडोर, दु.12 वा तामदर्डी, 12.30 वा. माचणूर, 1 वा. ब्रम्हपूरी, 1.30 वा. बठाण आणि 2 वा. उचेठाण, शनिवार,23 एप्रिल रोजी स. 8 वा. घरनिकी, 8.30 वा मारापूर,9.30 वा गुंजेगाव, 10 वा. महमदाबाद (शे), 10.30 वा. लक्ष्मीदहिवडी, 11 वा. लेंडवे चिंचाळे, 11.30 वाजता आंधळगाव, दु.12 वा. गणेशवाडी,12.30 वा शेलेवाडी, 1 वा. अकोला,1.30 वा कचरेवाडी आणि 2 डोंगरगाव असा गाव भेट दौरा पहिल्या टप्प्यात होणार आहे.या गावातील ग्रामस्थांनी आपल्या अडी - अडचणी व समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Solapur Mla Samadhan Avtade Today Village Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top