Solapur : सासू अन् सासऱ्याला जावयाकडून मारहाण

तुमच्या मुलीला मी घेऊन जाणार नाही, तिला इथेच ठेवणार असून नांदवणार नाही, मला घटस्फोट द्या’
मारहाण
मारहाण Sakal

सोलापूर - माहेरी असलेल्या पत्नीकडे आलेल्या पतीने तिला नांदवणार नाही, घटस्फोट दे म्हणत तिला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच सासू व सासऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी बॅटने पायावर व कपाळावर मारून जखमी केले. या प्रकरणी शशिकांत राम हिरवडे (रा. कामगार वसाहत, सुनील नगर) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मारहाण
Mumbai : सहकारी गृहनिर्माण परिषदेत झालेल्या घोषणांचे जीआर कधी; आमदार प्रवीण दरेकर

दरम्यान, शुक्रवारी (ता. २६) फिर्यादी गोविंद एकनाथ गायकवाड हे त्यांच्या घरी मुलगी सोनालीसोबत बोलत बसले होते. त्यावेळी त्यांचा जावई शशिकांत त्याठिकाणी आला. गप्पा मारताना सासरे जावयला म्हणाले, ‘सोनालीला सासरी कधी घेऊन जाणार. त्यावेळी चिडलेल्या जावयाने सासऱ्याला शिवीगाळ सुरु केली.

मारहाण
Mumbai : मुंबईतील नालेसफाई ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नाही; विरोधी पक्षातील नेत्याचा दावा

तुमच्या मुलीला मी घेऊन जाणार नाही, तिला इथेच ठेवणार असून नांदवणार नाही, मला घटस्फोट द्या’ असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर सासरा गोविंद गायकवाड यांना व त्यांच्या पत्नीला शशिकांतने लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण केली. बॅटने देखील मारले, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार नवले तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com