सोलापूर : विधान सल्लागारांनी अभिप्राय दिल्याने शहरातील 112 हेरिटेज वास्तूंच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यावर 53 हरकती आल्या. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा - सोलापूर महापालिकेत इतक्याजणांना कायम नोकरी
कमिटी स्थापन करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे
हेरिटेज कमिटी स्थापन करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हेरिटेज समिती स्थापन करण्यात महापालिकेने तब्बल 18 वर्षांपासून टाळाटाळ केली आहे. आताही हा विषय आयुक्तांनी मंजुरीसाठी पाठविला असताना काही जुन्या इमारती पाडण्यात हेरिटेज समितीची अडचण येऊ नये म्हणून हा विषय अजेंड्यावर घेण्यास टाळाटाळ केली गेली. मात्र "सकाळ'मध्ये मालिका प्रसिद्ध झाल्यावर तत्कालीन महापौर शोभा बनशेट्टी व तत्कालीन सभागृहनेते संजय कोळी यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला आणि सभेत एकमताने मंजूरही करण्यात आला. या समितीसाठी प्रशासनाने अध्यक्षपदासाठी महापालिकेचे माजी आयुक्त तथा माजी प्रधान सचिव टी. सी. बेंजामिन, तर सदस्यपदासाठी इतिहास भारतीय पुरातत्त्व संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विनायक धुळप, आर्किटेक्चर अमोल चाफळकर, सीमंतिनी चाफळकर, सविता दीपाली, पुष्पांजली काटीकर, अजित हरिसंगम यांची शिफारस केली आहे. हा विषय मार्गी लागण्यासाठी सहायक नगररचना संचालक लक्ष्मण चलवादी आणि अभियंता महेश क्षीरसागर यांनीही प्रयत्न केले.
हेही वाचा - शिवसेना स्वतंत्र गटाचा विषय बारगळला
म्हणून थांबली होती प्रक्रिया...
महापालिका सभेने ठराव मंजूर केल्यानंतर तो अभिप्रायासाठी विधान सल्लागारांकडे पाठविण्यात आला होता. त्या संदर्भात अभिप्राय आला असून, त्यानुसार कार्यवाही करण्याच्या प्रस्तावावर आयुक्त दीपक तावरे यांनीही स्वाक्षरी केली. जाहीर प्रसिद्धीकरणानंतर 18 जुलै रोजी यादी राजपत्रात प्रसिद्ध झाली. त्यानंतर आता वैयक्तिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी अपेक्षित आहे. याची प्रक्रिया अगोदरच होणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर लागलेली राष्ट्रपती राजवट यामुळे प्रक्रिया थांबली होती.
शहरातील हेरिटेज वास्तूंची वर्गवारी
इमारतींची मालकी ग्रेड एक ग्रेड दोन ग्रेड तीन एकूण
शासकीय इमारती 04 15 00 19
सार्वजनिक-निमसार्वजनिक 06 09 02 17
सार्वजनिक ट्रस्ट 03 39 04 46
खासगी 03 18 12 33
एकूण 16 81 18 115
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.