सोलापूर : NTPC, MIDCने नाकारले महापालिकेचे पाणी

पाणी नाल्यात सोडण्याची वेळ महापालिका प्रशासनावर ओढावली आहे.
NTPC
NTPCsakal

सोलापूर : मलनिस्सारण व्यवस्थापनांतर्गत सुरू असलेल्या एसटीपी प्रकल्पांमधून दररोज ८० एलएलडी पाण्यावर सेकंडरी ट्रीटमेंट करण्यात येते. मात्र प्रक्रिया झालेल्या पाण्यामध्ये सल्फाईडचे प्रमाण अधिक असल्याने एनटीपीसी आणि एमआयडीसीने महापालिकेचे पाणी नाकारले. त्यामुळे दररोज ८० एमएलडी पाणी नाल्यात सोडण्याची वेळ महापालिका प्रशासनावर ओढावली आहे.

मलनिस्सारण व्यवस्थापनांतर्गत सोरेगाव, देगाव, प्रतापनगर अशा तीन ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून या प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी एनटीपीसीला देण्याबाबतचा करार यापूर्वी झाला होता. आता तिन्ही एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या सांडपाण्यावर पहिली व दुसरी प्रक्रिया महापालिकेकडून केली जाते. सेकंडरी ट्रीटमेंटनंतरही पाण्यात सल्फाईडचे प्रमाण अधिक असल्याने एनटीपीसीला आवश्यक पाण्याची गुणवत्ता मिळत नाही. महापालिकेकडून प्राप्त होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी तिसरी प्रक्रिया होणे आवश्यक आहे. मात्र तिसरी प्रक्रिया ही एनटीपीसीने स्वत: करावयाची आहे. ही प्रक्रिया खर्चिक असल्याने एनटीपीसीने पाणी घेण्यास नकार दिला. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या या पाण्याबाबत अक्कलकोट रोड एमआयडीसीला विचारणा झाली. डाइंगसाठी हे पाणी चालत नसल्याचे एमआयडीसीने कळविले. त्यासाठी खासगी टॅंकरद्वारे विकतचे पाणी आणावे लागत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेला सांडपाण्यावर सेकंडरी ट्रीटमेंट करून पाणी नाल्यात सोडण्याची वेळ आली आहे.

तिन्ही एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. देसाई नगरात चौथा प्रकल्प उभारण्यात येत आहे. एनटीपीस व एमआयडीसीला या पाण्याबाबत विचारणा झाली. पाण्यात सल्फाईड अधिक असल्यामुळे मशिनरी व कलरिंगला हे पाणी चालत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सध्या नाल्याद्वारे शेतकऱ्यांना व इतर उद्योजकांना हे पाणी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महापालिकेकडील मक्तेदारांनी बांधकामासाठी व इतर कामासाठी एसटीपी प्रकल्पातील प्रक्रिया झालेले पाणी वापरण्याबाबत सांगण्यात आले आहे.

- पी. शिवशंकर, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com