सोलापूर : मंगळवेढ्यात खून एक संशयित ताब्यात

मयत सचिनचा मोबाईल पाण्यात फेकून देण्यात आला होता.
Crime
CrimeSakal

मंगळवेढा : तालुक्यातील अकोला येथे घरनिकी-अकोला रोडवरील वरकुटे वस्ती येथे ऊसाच्या शेतात सचिन सिद्धेश्वर वरकुटे (वय २१ रा. अकोला) या तरुणाची डोक्यात व मानेवर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी, मयत सचिन वरकुटे हा तरुण सकाळी ९ च्या सुमारास मोटार चालू करण्यासाठी घरासमोरच असलेल्या शेतात गेला होता. बराच वेळ झाल्यामुळे सचिन मोटार चालू करून आला नाही, कुठे गेला हे पाहण्यासाठी मयत सचिनची आई शेतामध्ये गेली असता सचिन मृतावस्थेत आढळला. दरम्यान, तत्काळ घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने, सत्यजित आवटे, अंकुश वाघमोडे, सौरभ शेटे, अविनाश पाटील, दयानंद हेंबाडे, विठ्ठल विभुते, दत्तात्रय तोंडले, श्रीमंत पवार, अर्जुन मुळे, विक्रम वाघमारे, राजू आवटे आदी घटनास्थळी हजर झाले.

मयत सचिनचा मोबाईल पाण्यात फेकून देण्यात आला होता. सदर खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवली असता विजय नामदेव वरकुटे (वय १८) या संशयितास ताब्यात घेण्यात आले. मयत व संशयिताचे मोबाईलचे सीडीआर लोकेशन मिळून तपास केला. सदरचा मोबाईल पोलिसांना सापडला व त्या मोबाईलमधील ॲप्सचा अभ्यास करून सदरचा खून ड्रीम इलेव्हन सी संबंधित गेमच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारातील असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com