Solapur News : महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा संप यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur One day strike of college employees successful Indefinite strike from 20 February

Solapur News : महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा संप यशस्वी

सोलापूर : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुरुवारचा एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी झाला. गुरुवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या गेटसमोर निदर्शने केली. आंदोलनाचा पुढील टप्पा २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा आहे.

मुंबईत बुधवारी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. परंतु अद्याप याचे इतिवृत्त मिळाले नाही आणि त्यातील मजकूर कळलेला नाही.

मागण्यांचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे, असे संयुक्त कृती समितीच्या वतीने विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी कळविले आहे.

आंदोलनात सहभागी कर्मचारी

या आंदोलनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ अंतर्गत पुढील महाविद्यालयांचे कर्मचारी सहभागी झाले होते. सोलापूर शहर : संगमेश्वर, दयानंद कला शास्त्र, दयानंद शिक्षण शास्त्र, दयानंद विधी, दयानंद वाणिज्य, ए. आर. बुर्ला, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, युनियन महिला, सोशल, वसुंधरा,लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यलय.

ग्रामीण : खेडगी कॉलेज (अक्कलकोट), विज्ञान महाविद्यालय (सांगोला), भारत महाविद्यालय (जेऊर), कर्मवीर भाऊराव पाटील (पंढरपूर), उमा महाविद्यालय (पंढरपूर), शिवाजी महाविद्यालय (बार्शी), झाडबुके महाविद्यालय (बार्शी), सुलाखे महाविद्यालय (बार्शी), शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बार्शी), राजर्षी शाहू विधी महाविद्यालय (बार्शी),

माऊली महाविद्यालय (वडाळा), संतोष भीमराव पाटील महाविद्यालय (मंद्रूप), बाबुराव पाटील महाविद्यालय (अनगर), शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय (नातेपुते), संत दामाजी महाविद्यालय (मंगळवेढा), खेडगी अक्कलकोट, महाडिक महाविद्यालय (मोडनिंब), विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय (टेंभुर्णी),

प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय (करमाळा), के. एन. भिसे महाविद्यालय (कुर्डूवाडी), माढा कॉलेज, शंकरराव मोहिते महाविद्यालय (अकलूज), रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान (अकलूज), गरड महाविद्यालय (मोहोळ)

या आहेत प्रमुख मागण्या

  • सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा.

  • सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा

  • सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला. त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा.

  • विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.

  • २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा

  • विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा