सोलापूर : शेतकऱ्यांच्या विश्वासामुळेच गाळपाचा उच्चांक

पृथ्वीराज माने सिद्धनाथ कारखान्याच्या रोलरचे पूजन
Solapur Prithviraj Mane Siddhanath factory
Solapur Prithviraj Mane Siddhanath factory sakal

सोलापूर : सीनाच्या नदी पट्ट्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ यासह बार्शी या तालुक्‍यातील ऊस उत्पादकांना सिद्धनाथ शुगर सर्वतोपरी सहकार्य करत आहे. ऊस उत्पादक शेतकरी विश्वासाने या कारखान्याला गाळपासाठी ऊस देत असल्याने दरवर्षी आपण गळिताचा उच्चांक करीत असल्याचे सिद्धनाथ शुगरचे उपाध्यक्ष पृथ्वीराज माने यांनी सांगितले.

तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ शुगरच्या २०२२-२३ वर्षाच्या गळीत हंगामाचे रोलर पूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास धनंजय भोसले, जनरल मॅनेजर संजीवकुमार जाधव, प्रोजेक्‍ट मॅनेजर बाबासाहेब पाटील, चीफ इंजिनिअर धनंजय पाटील, शेतकी अधिकारी बाळासाहेब काळे, चिफ केमिस्ट धुळा शेंबडे, मुख्य लेखापाल रामचंद्र वाकडे यांच्यासह कारखान्यातील विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com