सोलापूर : ‘विठ्ठला’च्या दर्शनासाठी रेल्वेच्या १२५ विशेष फेऱ्या

सोलापूर विभागाकडून तयारी अंतिम टप्प्यत; वारकऱ्यांसाठी सुविधा
रेल्वे
रेल्वे sakal

सोलापूर : आषाढी एकादशीला वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भेटीची ओढ लागली आहे. वारकरी पायी जाऊन लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतात. पंढरपूर येथे येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभागाकडून दहा दिवसांत रेल्वेच्या १२५ विशेष फेऱ्यांचे नियोजन केले असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

आषाढी एकादशीसाठी मराठवाडा, खानदेशासह पश्चिम महाष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरला येतात. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधमुक्तीनंतर यंदा पहिल्यांदाच पंढरीची वारी होणार असल्याने त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. यावर्षी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी ५ ते १५ जुलै यादरम्यान विशेष रेल्वेचे नियोजन केले आहे. प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, उपाहारगृह, रुग्णवाहिका, चौकशी कक्ष, संगणकीय उद्‌घोषणा कक्ष अशा सुविधा करण्यात येणार आहेत. आषाढी एकादशीचे औचित्य साधून पुणे-पंढरपूर, कुर्डुवाडी-मिरज, लातूर-मिरज, भुसावळ-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, बिदर- पंढरपूर आदी मार्गांवर स्पेशल रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांत जनरल तिकिटावर वारकऱ्यांना प्रवास करता येणर आहे. गाड्यांमध्ये सामान्य प्रकारच्या डब्यांचा समावेश असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ठळक बाबी...

  • - कोरोना निर्बंधानंतरची पहिलीच वारी

  • - यंदा पंढरपूर स्पेशल रेल्वेची पहिली फेरी ५ जुलैला धावणार

  • - भाविकांना जनरल तिकिटावर करता येणार प्रवास

  • - १० दिवस धावणार विशेष रेल्वे

  • - सोलापूर रेल्वे विभागाकडून १२५ विशेष फेऱ्यांची सोय

कोरोना निर्बंधानंतर यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी सोहळा होणार असून, या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागाकडून विशेष १२५ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. वारकरी सेवा मानून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यात येतील. प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com