सोलापूर : ऐनवेळी बदलला जातो प्लॅटफॉर्म!

सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होतेय धावपळ
सोलापूर
सोलापूरsakal

सोलापूर : येथील रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसांपासून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर येणार असते, मात्र शेवटच्या क्षणी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची घोषणा केली जात असल्याने प्रवाशांची दमछाक होत आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच आता रेल्वे प्लॅटफॉर्मबाबतही तक्रारी वाढल्या आहेत. ज्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे येणार आहे, त्या प्लॅटफॉर्मवर प्रवासी रेल्वेची वाट पाहात थांबलेले असतात. मात्र शेवटच्या क्षणी अचानक प्लॅटफॉर्म बदलल्याची उद्‌घोषणा केली जाते. ठरवून दिलेल्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे येण्याऐवजी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येत असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत आहे. अशावेळी अपंग, वृद्ध, महिला व लहान मुलांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर जड सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराकडे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. यात नोकरदार, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, उद्योजक आदी प्रवाशांची मोठी संख्या आहे. मात्र सोलापूर रेल्वे स्थानकावर नियोजन नसल्याने अशा घटना घडत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. २९ जूनपासून जनरल तिकिटाची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. त्यात प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट पाहात थांबणाऱ्या प्रवाशांची मात्र ऐनवेळी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर गाडी येत असल्याने तारांबळ उडत आहे. या प्रकाराकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

कोच इंडिकेटर्समुळेही मन:स्ताप

सोलापूर रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या गाड्यांची स्थिती समजण्यासाठी प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर लावण्यात आले आहेत. गाडी आल्यानंतर देखील इंडिकेटरवर डब्यांची स्थिती चुकीच्या पद्धतीने दाखविली जात असल्याने याचाही नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ऐनवेळी प्रवाशांना धावपळ करावी लागते. प्रवाशांना आपले साहित्य घेऊन धावपळ करत आपला डबा गाठावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com