
सोलापूर : रेनकोट-छत्र्यांच्या दरात तीस टक्क्यांनी वाढ
सोलापूर : शहर परिसरात रिमझिम व मोठ्या पावसाचा पत्ता नाही. तरी अधूनमधून काही वेळा पावसाने हजेरी लावल्यानंतर बाजारात यावर्षी रेनकोट, छत्र्यांचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादन निर्मिती व वाहतूक खर्चामुळे या उत्पादनांचे दर चांगलेच वाढले आहेत. शाळा सुरू होत असतानाच पावसाचे आगमन होते. त्यासोबत बाजारात आकर्षक रेनकोट, कॅप, छत्र्या आदी साहित्य विक्रीसाठी आले आहेत. तसेच शेती व घरगुती कामासाठी ताडपत्रीची विक्री सुरू झाली आहे. बाजारात यावर्षी या उत्पादनांना महागाईचा फटका बसला आहे.
प्लास्टिकच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला आहे. त्याचा फटका दरांना बसला आहे. सोलापूर बाजारपेठेला मुंबई, दिल्ली येथून हा माल सर्वाधिक पुरवला जातो. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून, त्यामुळेदेखील किमतीत वाढ झाली आहे.
रेनकोटमध्ये महिलांसाठी लांबीचे रेनकोट, पुरुषांसाठी पॅंट-शर्ट प्रकारातील रेनकोट उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीसाठी कार्टूनची चित्रे असलेले रेनकोट उपलब्ध आहेत. टू इन वन म्हणजे दोन्ही बाजूने वापरण्याचे रेनकोट देखील मिळत आहेत. ब्रॅंडेड प्रकारात देखील रेनकोटची विक्री चांगली होत आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक वापरली जाणारी १२ काड्यांची छत्री आजही सर्वाधिक विकली जाते. शाळकरी मुलांसाठी लहान आकाराच्या छत्र्या, लेडीज छत्रीसह प्रिंटेड प्रकारात देखील छत्र्या उपलब्ध झाली आहेत. याशिवाय कॅपमध्ये वूलन व रेग्झिनचे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.
ठळक बाबी...
यावर्षी रेनकोटचे दर २० टक्क्यांनी वाढले
निर्मिती खर्चात झाली वाढ
वाहतूक खर्चात मोठी वाढ
बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रेनकोट व छत्र्यांची मागणी
Web Title: Solapur Raincoat Umbrella Prices Hiked
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..