
Solapur News : "चार्वाक पुस्तक वाचल्यामुळे मी व्यसनापासून दूर गेलो"
मंगळवेढा- साहित्यिक आ.ह.चे चर्वाक पुस्तक वाचण्यात आल्याने माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली जर हे पुस्तक वाचण्यात आले नसतो तर मी गुन्हेगार व्यसनाधिन झालो असतो त्या पुस्तकाच्या वाचनामुळे व्यसनाधीनतेपासून दूर राहत चित्रपट सृष्टीत नाव कमावल्याचे सैराट चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
येथील आप्पाश्री लाॅन्समध्ये गौरव परिवर्तन विचाराचा आ.ह.विचारवारी या दोन दिवशीय साहित्यीक कार्यक्रमातील दुसऱ्या दिवसातील आ.ह.साळुंखे यांच्या क्षमायाचना कृतज्ञता या पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी साहित्यिक आ.ह.साळुंखे यांना मानपत्र व जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्वागत अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे डॉ आ.ह. साळुंखे, पत्रकार विजय चोरमारे,अभिनेत्री प्राजक्ता हणमघर,डाॅ.राजन खान,डाॅ रणधीर शिंदे,अप्पर आयुक्त वैशाली पंतगे,आरोग्य संचालक प्रदीप आवटे,
डॉ कृष्णा इंगोले,डाॅ. मधुकर जाधव, , महावीर जोंधळे, शामसुंदर मिरजगावकर,वित्त लेखा अधिकारी अजित शिंदे,प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर,अजित जगताप,प्रविण खवतोडे,चंद्रकांत घुले,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,इंद्रजित घुले आदीची उपस्थिती होते.
यावेळी बोलताना दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, मला अनेक चित्रपटाला रसिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळाले पण त्यापेक्षा माझ्या हस्ते साहित्यिक आ.ह.साळुंखे यांचा गौरव करण्याचे भाग्य मिळाले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन खान म्हणाले की आ.ह. चे विचारसहित्य मराठी बरोबर अन्य भाषा मधून देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हवे आणि आ.ह. विचारवारी संपूर्ण महाराष्ट्रभर झाली पाहिजे यावेळी बोलताना साहित्यिक महावीर जोंधळे म्हणाले
की आ.ह.च्या विचारासाठी पुढील वर्षापासून साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल चार्वाक पुरस्कार प्रदान करणार असल्याची घोषणा केली.उपस्थित मान्यवराच्या हस्ते आ.ह.साळुंखे यांचा मानपत्र,सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.सकाळ च्या सत्रात आ.ह.मुलाखत घेण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी इंद्रजीत घुले यांनी केले. उपस्थितांचे आभार नगरसेवक अजित जगताप यांनी मांनले.