सोलापूर : रिटेवाडीच्या रस्त्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक 9 मे पासून उपोषण

निधी मंजूर होऊनही संबंधित विभाग काम सुरू नसल्याने, ग्रामस्थ संतप्त
Solapur Ritewadi Villagers strike for roads may nine
Solapur Ritewadi Villagers strike for roads may ninesakal

करमाळा : करमाळा तालुक्यातील रिटेवाडी गावांला 45 वर्षापासून रस्ता नव्हता. या गावांच्या रस्त्याला मोठ्या प्रयत्नानंतर निधी मंजुर झाला माञ निधी मंजुर होऊनही संबंधित विभाग काम सुरू करत नसल्याने सरपंच दादासाहेब कोकरे व ग्रामस्थांनी ऑक्टोबर 2020 मध्ये उपोषण सुरू केले.त्यानंतर आठ दिवसाच्या उपोषणानंतर प्रशासनाने दखल घेऊन या रस्त्याचे काम सुरू केले.पण आता निधी नसल्याचे कारण सांगुन काम जाणीवपूर्वक बंद ठेवले असल्याने ग्रामस्थ पुन्हा 9 मे पासुन उपोषण करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संबंधित विभागांना  दिले आहे.

करमाळा तालुक्यातील रिटेवाडी गावाला पंचेचाळीस वर्षापासून रस्ता नसल्याने अनेक आंदोलने करुन रस्ता मिळवला. माजी आमदार नारायण पाटील याच्या काळात या रस्त्याला निधी मंजुर झाला.पण 2019 विधानसभा निवडणुकांच्या नंतर रस्ता पुन्हा रखडला होता. त्यामुळे ग्रामस्थांची अडचणीत भर पडली. रस्त्यावरुन ये- जा अडकुन पडली. तर रुग्ण, वृद्ध व शाळकरी मुलांचे हाल तर होते. रिटेवाडीतुन शेतमाल आणण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये उपोषणाचे हत्यार उपसले. त्यावेळी बैठकातुन निर्णय होऊन रस्त्याचे काम सुरु झाले. पण आता पुन्हा रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गावकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. याबाबत ग्रामसभेत ठराव पास करुन पाच तारखे पर्यत कामाला सुरुवात झाली नाही. तर 9 मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी सरपंच दादासाहेब कोकरे, अंगद गोडगे, अनिल वलटे, विष्णू खटके, सचिन रिटे, कल्याण कोकरे, भिवा कोकरे, नागनाथ रोकडे, संभाजी रिटे, निलेश कोकरे, बिभीषण मस्के, भिवा रिटे, नवनाथ रिटे, आप्पासाहेब कोकरे, राजु पवार, तायप्पा पवार , दिलीप कोकरे, उत्तरेश्वर रिटे, धनंजय रिटे, संपत लट्टे, मगनदास कोकरे, शिवाजी पवार, किशोर खरात, सतिश रिट्र, नितीन कोकरे, बिरुदेव कोकरे, दादासाहेब ढवळे, भारत कोकरे, शहाजी नगरे, लालासाहेब ढवळे, किरण पाबळे, अमोल कोकरे आदि उपस्थित होते.

निधी मंजुर झाल्यानंतर रिटेवाडी रस्त्याचे काम सुरू करायला एक वर्षे लावले, रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी उपोषण केले.मग रस्त्याचे काम सुरू झाले. आता सुरू असलेले रस्त्याचे काम जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतर देखील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात ,आज करू उद्या सुरू करू असे सांगतात मात्र काम सुरू करत नाहीत.संबंधित ठेकेदार देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत.अर्धवट काम झाल्याने ग्रामस्थांना ञास होत आहे.म्हणून आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.

-दादासाहेब कोकरे,सरपंच, रिटेवाडी ता.करमाळा, जि.सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com