सोलापूर : RPF पोलिसांनी दोन लाखांची बॅग केली परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सोलापूर रेल्वे सुरक्षा बल

सोलापूर : RPF पोलिसांनी दोन लाखांची बॅग केली परत

सोलापूर : सोलापूर रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. प्रवाशाची विसरलेली दोन लाख रुपये असलेली बॅग पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्या स्वाधिन केली आहे.सोलापूर येथील मलंग गायकवाड दाम्पत्याकडून (रा. रहमत बी. टेकडी सिद्धेश्वर पेठ) बुधवारी फलाट क्रमांक-१ वर आलेल्या गाडी क्रमांक 16339 मुंबई-नागरकोईल एक्सप्रेसने जनरल डब्यातून प्रवास करीत असताना घाईगडबडीत खाली उतरताना गायकवाड यांनी आपली हॅण्डबॅग विसरली. बॅगमध्ये दोन लाखांची रोख रक्कम आणि वैयक्तिक कागदपत्रे असा ऐवज होता.

सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी गाडी क्रमांक 16339 मुंबई-नागरकोइल एक्सप्रेसमध्ये गस्त घालत असताना बॅग बेवारस स्थितीत आढळून आली. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवान TOPB टीमचे हेड कॉन्स्टेबल, एस. टी. बिराजदार, कॉन्स्टेबल राम अवतार आणि जीआरपी कॉन्स्टेबल दीपक साळवी यांना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्यांनी ती बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांनी ही बाब तातडीने वरिष्ठांना सांगितली. हा सर्व प्रकार बुधवारी घडला. सोलापूर पोलिसांनी बॅगेतील वस्तूंची खातरजमा झाल्यावर त्या बॅगेतील ऐवज ताब्यात घेतला. याबाबत सोलापूर विभागीय आरपीएफचे रेल्वे सुरक्षा आयुक्त श्रेयस चिंचवाडे यांनी याबद्दलची माहिती दिली.

बॅगेची तपासणी केल्यावर बॅगेत दोन लाख रुपयांची रोकड, आधारकार्ड व स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँकेचे पासबुक सापडले. वैयक्तिक डायरी होती. त्यावर मोबाईल क्रमांक मिळताच संपर्क पोलिसांनी तात्काळ करून बॅगमधील सामानावरून दाप्मत्याचा शोध घेतला आणि पत्नी व आई व दोन 2 पंचांसमोर सुपूर्द करण्यात आली. नंतर, प्रवाशाने रोख रकमेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. या प्रशंसनीय कार्याबद्दल आरपीएफचे मलंग गायकवाड यांनी आभार मानले. ही कामगिरी TOPB टीमचे हेड कॉन्स्टेबल, एस. टी. बिराजदार, कॉन्स्टेबल राम अवतार आणि जीआरपी कॉन्स्टेबल दीपक साळवी यांनी केली. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Solapur Rpf Police Returned Two Lakh Bags

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top