
Solapur : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत दिरंगाई; आमदार आवताडे घेणार अधिकाऱ्यांची घेणार झाडाझडती
मंगळवेढा - पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्कल चौकशीच्या नावाखाली होत असलेली गैरसोय लक्षात घेता आज सकाळ ने वृत्त प्रसिद्ध केले होते या प्रश्नासह तालुक्यातील जलजीवन व कृषी खात्याच्या खरीप पेरणीपूर्व आढाव्यासाठी उद्या बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
यापूर्वी आ.समाधान आवताडे यांनी नगरपालिका व महावितरणच्या प्रश्नावरून बैठक घेऊन अधिकाऱ्याची झाडाझडती घेतली होती या घटनेनंतर आता तहसील, पाणीपुरवठा आणि कृषी खाते आता रडारवर आले.तहसील कार्यालयातून नवीन पीएम किसन नोंदणीसाठी सहा महिन्यापूर्वी अर्ज देऊन देखील तहसील कार्यालयाने कारवाई केली नाही उलट गेल्या काही दिवसात याला सर्कल चौकशीच्या नावाखाली नोंदणी लांबवण्याचा प्रस्ताव केला.
गैरसोय अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईतून जालीहाळमध्ये निम्म्याहून अधिक शेतकरी वगळले आहेत. इतर नुकसानग्रस्त लाभार्थ्यांची भरपाई हे विषय उद्या बैठकीत चर्चेला येणार आहेत याशिवाय ग्रामीण पाणी पुरवठा खात्याकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेतला जात आहे जाणार आहे.
याशिवाय भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने आढावा घेऊन त्या दृष्टीने निर्णय घेतले जाणार आहेत खरीप पेरणीपूर्व हंगामामध्ये तालुक्यामध्ये आवश्यक असलेले खते बियाणे व कृषी खात्याकडे विविध योजनेच्या संदर्भात होत असलेली दिरंगाई तसेच खरीप पिक विम्याची ऑनलाईन तक्रार करून देखील विमा कंपनीने शेतकऱ्याच्या नुकसानीचे न केलेले पंचनामे, पिक विम्याची शेतकऱ्यांना दिलेली कमी नुकसान भरपाई यावर देखील यामध्ये चर्चा होणार आहे.
सदरची बैठक लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे उद्या स. 10 वाजता होणार असल्याने नागरिकांनी आपल्या अडचणी घेऊन हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेले आ. अवताडे यांच्या उद्याच्या बैठकीत कुणाची झाडाझडती घेणार याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे.