Solapur : दामाजी कारखान्याचे उच्चांक 28 दिवसात केले लाखाचे गाळप

येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये 28 दिवसात लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला
Solapur
Solapur Sakal

मंगळवेढा : येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये 28 दिवसात लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला असून संस्थेच्या इतिहासात कमी दिवसात 1 लाख मे टन गळीत करणेचा उच्चांक केला असलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.

यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले कि, कारखाना उभारणीपासुन आजपर्यंत झालेल्या हंगामात कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळपाचा उच्चांक कारखान्यातील कामगार,ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा व ऊस उत्पादक सभासदांचे सहकाय्राने करु शकलो.कारखान्याकडे इतर कोणतेही उपपदार्थाचे प्रकल्प नसताना देखील {वदयमान संचालक मंडळाच्या पहिल्या गळीत हंगामात संचालक मंडळाला सत्तेत येवून चार महिने झाले.

तीन लाख शिलकेवरुन कारखाना सुरु करण्यापूर्वी अनंत अडचणी आल्या.अडचणीत असणाय्रा दामाजीसाठी पांडूरंग कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, विठ्ठलचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके, धनश्री परिवाराचे प्रा.शिवाजी काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहा,जिजामाता पतसंस्थेचे रामकृष्ण नागणे, बळीराजा पतसंस्थेचे अध्यक्ष दामोदरबापू देशमुख, यांनी बँका/पतसंस्थाच्या माध्यमातून कारखान्यास आर्थिक सहकार्य व मार्गदर्शन केल्याने हा गळीत हंगाम वेळेवर सुरु होण्यास मदत झाली.

जिल्हयातील इतर कारखान्यांच्या तुलनेत दामाजी कारखान्याचा दैनिक साखर उतारा दुस-या क्रमांकाचा असून सरासरी तिस-या क्रमांकावर आहे. कारखान्याची दैनिक गाळप क्षमता प्रतिदिन 2500 मे टन असताना मशिनरी दुरुस्तीची कामे प्रत्यक्ष लक्ष देवून चांगल्या प्रकारे करुन घेतलेने प्रति दिवस 3700 ते 3800 मे टन सरासरी गाळप होत असून आजपर्यंत 90,140 क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून साखर उतारा 10.56% व सरासरी 9 21% मिळाला आहे.उपाध्यक्ष तानाजी खरात व सर्व संचालक मंडळ सदस्यानी मटेरियल खरेदी/दुरुस्ती करणे, त्याचा पाठपुरावा करणे, तोडणी वाहतुक डव्हान्स वाटप, दैनिक कामकाज, कामगारांच्या अडचणी या प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष देवून काटकसर करुन वेळेत कारखाना सुरु करणेसाठी योगदान दिल्यामुळे कारखान्याचे गाळप व्यवस्थीतपणे सुरु असून उददीष्ठपूर्तीचे दिशेने वाटचाल असल्याचे सांगून अध्यक्ष पाटील म्हणाले कीकारखान्याचे सर्व सभासद-शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणचे कंत्राटदार, सिझन कामाचे कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे कारखान्याचे गाळप सुरळीत चालू आहे.तसेच चालू गळीत हंगामामध्ये संचालक मंडळाने ठरविलेले गाळपाचे उद्ष्ठि पूर्ण होणेसाठी तालुक्यातील सभासद-शेतकय्रांनी यांनी आपला ऊस संत दामाजी साखर कारखान्यास गळीताला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सदर प्रसंगी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक सुनिल दळवी तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com