Solapur : सिध्देश्वर कारखाना बचावसाठी शेतकऱ्यांची टोकाची साद, मुख्यमंत्र्यांना चक्क रक्ताने लिहले पञ !

कारखाना बचावसाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर गेल्या 32 दिवसांपासून कामगारांचे तर
पञ
पञ sakal

शिवाजी भोसले

सोलापूर : विमानसेवेचे निमित्त पुढे करून काही दुष्ट मंडळींच्या कपट कारस्थानातून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास दिलेली नोटीस मागे घ्यावी यासाठी गेल्या 32 दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ, सिध्देश्वर राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार व शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे (चपळगाव) यांनी आपल्या रक्तांनी जळजळीत पत्र लिहून कारखान्याविरुध्दच्या सर्व नोटिसा मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कारखाना बचावसाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर गेल्या 32 दिवसांपासून कामगारांचे तर शेतकर्‍यांचे 31 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. बोरामणी येथे मंजूर असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करा, कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळाच्या 15 नंबर धावपट्टीवरून विमानसेवा सुरू करा, कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी कामगार आणि कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी सोलापूर-विजयपूर, सोलापूर-हैदराबाद या महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com