सोलापुरात स्मार्ट शहर सुरक्षित शहर संकल्पनेची होईल पूर्तता! CCTVची गरज

स्मार्ट सिटी योजनेच्या या टप्प्याच्या पूर्ततेमुळे सोलापूर 'लिव्हेबल' व सुरक्षित शहर होईल.
Smart-City
Smart-CitySakal
Summary

स्मार्ट सिटी योजनेच्या या टप्प्याच्या पूर्ततेमुळे सोलापूर "लिव्हेबल' व सुरक्षित शहर होईल.

सोलापूर स्मार्ट शहर (Solapur Smart City) व्हावे म्हणून सुरु केलेल्या प्रयत्नातील विकासाच्या योजनांचा पहिला टप्पा रस्ते बांधणीचा अंतिम टप्प्यात आहे. याबरोबरच अन्य 41 कामे मार्गी लागले आहेत. त्यातील 17 कामे चालू आहेत. सामान्य माणूस सुखाने जगण्याचे शहर, सुरक्षित शहर व्हावे या संकल्पनेतून स्मार्ट सिटीची बांधणी करण्याचे नियोजन आहे. त्यातील महत्त्वाच्या अशा सीसीटीव्ही (CCTV) लावण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरवात होईल. यातून महिलांच्या सुरक्षिततेचा व एकूणच शहर सुरक्षिततेचा, वाहतुकीवर नियंत्रणाचा मंत्र जपला जाणार हे निश्‍चित! स्मार्ट सिटी योजनेच्या या टप्प्याच्या पूर्ततेमुळे सोलापूर "लिव्हेबल' व सुरक्षित शहर होईल.

Smart-City
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या बैठकीत पाणी पेटले

सोलापूर शहरातील 16 चौकांत स्मार्ट ट्रॅफिक सिस्टिम आणि 116 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या तीन-चार दिवसातील चोऱ्यांचे प्रमाण, चौकाचौकातील अपघात, घटना, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याच्या प्रकारावर यातून निश्‍चितच आळा बसेल. इतकेच नाही तर असे गुन्हे करणाऱ्यांवर या तिसऱ्या डोळ्याची नजर असल्याने एक तर घटनाच घडणार नाही अन्‌ घडली तरी ती तातडीने उघडकीस येईल. त्यामुळे सोलापूर सुरक्षित शहर म्हणून गणले जाईल, सोलापुरातील सुरक्षा आणि वाहतुकीच्या दृष्टीने 49 कोटींची सीसीटीव्हीची योजना आहे. चौकाचौकातील वाहतूक नियंत्रण पद्धतीसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर कमांड कंट्रोल सेंटरमधून पथदिव्यांचे जिओ टॅग, घनकचरा, घंटागाड्या, पाणीपुरवठ्यासारख्या जीवनावश्‍यक बाबीची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सहा बाय दोन फुटाच्या स्क्रिनची उभारणी होत आहे. या योजनेतून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

Smart-City
सोलापूर : स्मार्ट शाळांची सहा कोटींची योजना बारगळली

ट्रिपल सीट, नो एंट्री, अवैध वाहतुकीवर यातून आपोआपच आळा बसेल. सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्स सिस्टीममधून फेस रिडींगद्वारे तपासास मदतच होईल. घटनेनंतर संबंधितांचा शोध घेण्यात पोलिसांना मदत होईल. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आळा बसावा म्हणून ऑनलाईन चलनही फाडले जाईल. यापूर्वी संभाजी महाराज चौकात ही व्यवस्था होती, परंतु यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे येथील सीसीटीव्हींनी माना टाकल्याचे दिसत आहे. सोलापुरात काही ठिकाणी पूर्वी लावलेले सीसीटीव्ही वापराविना पडून आहेत. त्यातील अनेक संच "आऊटडेटेड' झाले आहेत. केवळ सीसीटीव्ही असल्यानेच अनेक घटनांपासून गुन्हेगार दूर राहतील. अपवादात्मक स्थितीत काही गुन्हेगार यातूनही मार्ग काढतील यात शंका नाही. पण या माध्यमातून निश्‍चितच मोठ्या प्रमाणात सुरक्षेवर भर दिला जाणार आहे.

अडचणीत सापडलेल्यांसाठी मदत म्हणून काही असुरक्षित चौकांमध्ये पॅनिक बटनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखाद्या घटनेत कोण मदत करणार, हा प्रश्‍न यातून निकाली निघेल. आरोग्यविषयक सुविधांसाठी ही सोय मोलाची ठरेल. यासाठी स्मार्ट सिटी व पोलिसांमध्ये समन्वय राहण्याची गरज आहे. याचे संपूर्ण नियंत्रण महापालिका आणि पोलिस नियंत्रण कक्षाकडे राहील. त्यामुळे एखाद्या घटनेबाबत तातडीने निर्णय घेणे सोयीचे होणार आहे.

Smart-City
सोलापूर विभागांतील एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड धारकांना मिळणार लाभ

सुरक्षिततेला मोठे महत्त्व

वाईन शॉप फोडून पावणे पाच लाखांचा ऐवज लांबविला. वृद्ध दाम्पत्याकडून अकरा लाखांचे दागिने चोरले. हॉटेल व्यावसायिक व त्याच्या शेजारचे घर फोडून 75 तोळ्यांचे दागिने व दोन लाखांची रोकड लांबविली. बंगला फोडून दागिने पळविल्याच्या सोलापुरातील गेल्या चार दिवसात पोलिसात दाखल झालेल्या घटना आहेत. चोरट्यांनी जवळपास 100 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर अन्‌ सुमारे 15 लाखांच्या रोकडवर डल्ला मारला आहे. केवळ सुरक्षा रक्षक अन्‌ सीसीटीव्ही यंत्रणा असती तर यावर काही प्रमाणात का होईना नियंत्रण आले असते. स्मार्ट सिटीच्या योजनेत नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठे महत्त्व आहे.

लक्षवेधी

- रंगभवन प्लाझा, ई-टॉयलेट, लक्ष्मी मंडई, स्ट्रीट मार्केट, श्री सिध्देश्‍वर तलाव सुशोभिकरण, 4 हजार पथदिवे, सोलार सिस्टिम, इंदिरा गांधी स्टेडिअम, होम मैदान सुशोभिकरण आदी 41 कामे पूर्ण.

- स्मशानभूमी सुशोभिकरण, स्मार्ट मीटर, शासकीय इमारतींवर सोलार सिस्टिम -2, स्टेडिअम फेज - 2, एबीडी एरिआतील रस्ते, इंद्रभवन सुशोभिकरण, स्मार्ट नियंत्रण कक्ष, ड्रेनेज, जलवाहिनी लाईनसह पावसाच्या पाण्याची निचरा होण्याकरिता डक आदी 17 कामे सुरू आहेत.

- सोलापूर - उजनी समांतर जलवाहिनी, कमांड कंट्रोल सिस्टिम ही कामे निविदा प्रक्रियेत आहे तर शहरातील दोन उड्डाणपूल अद्याप भूसंपादनामध्ये अडकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com