Solapur : आरोग्यमंत्र्याच्या मंगळवेढा दौरा ; रखलेल्या आरोग्य प्रश्नावर उपचाराची गरज Solapur Tanaji Sawant Health Minister Tuesday Tour underlying health problem | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanaji Sawant News

Solapur : आरोग्यमंत्र्याच्या मंगळवेढा दौरा ; रखलेल्या आरोग्य प्रश्नावर उपचाराची गरज

मंगळवेढा : शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अनेक अडचणी येत असून राज्यातील सत्ता बदलल्यानंतर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत पहिल्यांदाच तालुका दौऱ्यावर येत आहेत.आरोग्याशी रखडलेल्या प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त करताना ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मंजूर असलेल्या नऊ आरोग्य उपकेंद्रे व प्रस्तावित उपकेंद्राला अद्याप मुहूर्त सापडेना.शिवाय रिक्त पदे भरली नाहीत. त्यामुळे आजच्या दौय्रातून आरोग्य खात्याचे सक्षमीकरण करणार, की पुन्हा दुर्लक्ष करणार ? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

दोन महामार्गामुळे तालुक्यात दळणवळणाची साधने वाढली आहेत. वाहनाच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे मरवडे या ठिकाणी 108 या अध्यायावत रुग्णवाहिकेची गरज आहे, मात्र अद्याप त्याकडे लक्ष दिले जात नाही. मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयातील वाढीव बेडचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला आहे तो अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

तालुक्यातील रुग्णाला तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी ट्रामा केअर सेंटर ची गरज आहे त्यास तात्काळ मंजुरी मिळण्याची आवश्यकता आहे,पाच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने कात्राळ, सोड्डी, येड्राव, खोमनाळ, ढवळस, अकोला, लेंडवे चिंचाळे, सलगर खु, कचरेवाडी येथे आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी दिली. परंतु ढवळस व लेंडवे चिंचाळेला जागा उपलब्ध झाली नाही.

तर मंजूर उपकेद्रास निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा कमी पडल्याने या उपकेंद्राचे काम रखडले.इतर तालुक्‍यांत मंजूर असलेल्या उपकेंद्रांस त्या तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी निधी नेऊन ती कामे मार्गी लावली. मंगळवेढ्यातील कामास मात्र अद्याप मुहूर्त मिळेना.तर प्रस्तावित असलेल्या शिरनांदगी, लोणार, नंदूर, तळसंगी, गुंजेगाव, चिक्कलगी, दामाजीनगर याबरोबरच उचेठाण (कारखाना साईट), हुलजंती प्राथमिक आरोग्य केंद्राचा तर निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्ष कामास सुरुवात कधी होणार

याचा प्रश्न विचारला जात आहे तालुक्यामध्ये जवळपास 1300 पेक्षा अधिक हातपंप असल्यामुळे पाणी तपासणीची प्रयोगशाळा तालुक्यात नसल्यामुळे तोकड्या मानधनावरील जल सुरक्षा रक्षकांना पाणी तपासणीसाठी सांगोला येथे जावे लागत आहे तालुक्यात पाणी तपासणीची प्रयोगशाळा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयात उपचारापेक्षा कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागल्याने माजी मंत्र्याला आरोग्य खात्याचा कारभार डिजिटल फलकावर आणावा लागला र राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍याने याबाबत तक्रार देखील केली होती

आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे या खात्याचा पदभार घेण्यापूर्वी साखर कारखानदारीच्या निमित्ताने मंगळवेढ्याची संबंध आहे, तालुक्याच्या दक्षिण भागात आपले राजकीय बस्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात सावंत बंन्धू असून त्यामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी त्यांच्याकडूनच अपेक्षा लागून राहिल्या.

टॅग्स :Solapur