Solapur : "उजनीचे पाणी सोडल्याने मोहोळ तालुक्यात आनंदाचे वातावरण, पिके डोलू लागली...

नुकताच उन्हाळा सुरू व्हायला व पाणी सुटायला गाठ पडल्याने ऊस, मका, भुईमूग या पिकासह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, केळी आदी फळबागांना मोठे जीवदान मिळाले आहे.
Solapur
Solapursakal

Solapur - गेल्या तीन महिन्या पासून उजनी डाव्या कालव्याला शासनाने पाणी सोडल्याने मोहोळ तालुक्यातील विविध पिके व फळबागा डोलू लागल्या आहेत, तर विहिरी बोअर यांच्या पाणी पातळीत भरघोस वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.मार्च मध्ये उजनी कालव्याला सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी सोडले आहे.

Solapur
Solapur : करमाळ्याचे DYSP विशाल हिरेंची पिंपरी चिंचवड सहाय्यक आयुक्त पदी बदली तर अजित पाटील नवे DYSP

नुकताच उन्हाळा सुरू व्हायला व पाणी सुटायला गाठ पडल्याने ऊस, मका, भुईमूग या पिकासह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, केळी आदी फळबागांना मोठे जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे चाऱ्यासाठी मका, कडवळ अशी पिके घेतली जातात. त्यामुळे चारा महागला परंतु टंचाई नाही.

Solapur
Solapur Water Issue : तीन दशकांपासून नियमित पाण्यासाठीच संघर्ष

उजनी कालव्याचे पाणी पाझरून परिसरातील विहिरी, बोअर यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कालव्या वरून पापरी, खंडाळी, रोपळे, येवती आधी गावातील शेतकऱ्यांनी जलवाहिन्या टाकून पाणी नेले आहे. त्यामुळे या गावांच्या विहिरी बोअरची ही पाणी पातळी वाढली आहे. सध्या मका लागवड जोरात सुरू आहे,

Solapur
Mumbai : एसी लोकल, मोनो, मेट्रोमध्ये लगेज डब्यांची व्यवस्था करा! मुंबई डबेवाला असोसिएशनची मागणी

तसेच झेंडू शेवंती या फुलबागांचीही लागवड प्रगतीपथावर आहे. सध्या शेतकरी खरीप पेरणी च्या तयारीला लागला आहे. त्यामुळे जमिनीच्या मशागतीला ही वेग आला आहे. तसेच जुन पासून ऊस लागवडी वेग घेतात, त्यासाठी ऊसबेणे व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे औषध शेतकरी खरेदी करताना चे चित्र पहावयास मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com