Solapur: स्मार्ट सिटीच्या बैठकीत पाणी पेटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या बैठकीत पाणी पेटले

सोलापूर : सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा दर १०० कोटीने वाढला आहे. वाढीव मोबदला मंजूर केल्याशिवाय पोचमंपाड कंपनीने काम करण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल आठ तास चाललेल्या स्मार्ट सिटी संचालकांच्या बैठकीत पाणी पेटल्याचे दिसून आले. अखेर पोचमंपाड कंपनीचा मक्‍ता रद्द करून नवीन टेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटीचे प्रधान सचिव आसीम गुप्ता यांनी दिली.

नियोजन भवन येथे स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक प्रधान सचिव आसीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील, पोलिस आयुक्‍त हरिश बेंजल, महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्‍त पी. शिवशंकर, सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या उपस्थित झाली.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

या बैठकीच्या अजेंड्यावर नूतन पोलिस आयुक्‍तांनी संचालक म्हणून नियुक्‍ती करणे, स्मार्ट सिटीचे बॅंक खाते, प्राप्त निधी तपशील, निधीचा विनियोग याला मान्यता, प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांवर चर्चा व धोरणात्मक निर्णय, वैधानिक लेखापरीक्षकासह कंपनी लेखापरीक्षकांनी केलेल्या नोंदी, सल्लागार क्रिसील कंपनीच्या देयक यांसह समांतर जलवाहिनीचा महत्त्वाचा विषय प्रस्तावित होता. समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा ४५५ कोटींचा मक्‍ता पोचंमपाड कंपनीला देण्यात आला होता.

या प्रकल्पाच्या वाढीव १०० कोटी दरापोटी कंपनीने चार महिन्यांपासून काम बंद ठेवले आहे. काम बंद ठेवल्याने या कंपनीला प्रतिदिवशी १७ हजार रुपयाचे दंड सुरू आहे. तरीदेखील कंपनीला एक संधी आजच्या बैठकीत देण्यात आली. मात्र कंपनीने वाढीव बजेटशिवाय काम करण्यास नकार दिला. त्यामुळे समांतर जलवाहिनीचे काम रखडले असून आता नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

बैठकीत सहा तास पाण्यावर चर्चा

नियोजन भवनात सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी साडेसहा वाजता संपली. या बैठकीच्या अजेंड्यावर बारा विषय प्रस्तावित होते. त्यातील समांतर जलवाहिनी शहरवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न होता. या आठ तासाच्या बैठकीत समांतर जलवाहिनीवर तब्बल सहा तास चर्चा झाली. अखेर जे होणार होते तेच घडले. जुना मक्‍ता रद्द करून नवीन मक्‍तेदार नियुक्‍तीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २०२२ मध्ये पूर्ण होणारे प्रकल्पाला आता २०२४ चा मुहूर्त मिळाला आहे.

loading image
go to top