
Solapur News : सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता; जलवाहिनीला मोठी गळती
सोलापूर : पाणीपुरवठा करणारी यशवंतसागर ते सोलापूर या जलवाहिनीला सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शहराजवळील कॉलेजच्या गेट जवळच मोठी गळती लागली आहे. दोन तास झाले हजारो लिटर पाणी त्यातून वाया जात आहे.
सोलापूर शहराला यशवंतसागर जलाशयातून जलवाहीनी द्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सुमारे दोन तासापूर्वी शहरा जवळील बीपीएड कॉलेजला जाणाऱ्या गेट जवळच "भुईट्या" गळती लागली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेच्या चारीत मोठे पाणी साचले आहे. गळती लवकर बंद न केल्यास सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गळती वरचेवर वाढतच आहे.
दरम्यान जलवाहिनीला गळती लागल्याने परिसरातील नागरिकांनी तसेच परिसरातील विविध व्यवसायिकांनी पाण्याच्या बादल्या व घागरी भरून घेण्यासाठी झुंबड उडाली होती.जवळच असलेल्या आंबा व सिताफळ या बागेत ही पाणी साचले होते.