Solapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम, ढोल ताशाच्या गजरात मर्दानी खेळही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम, ढोल ताशाच्या गजरात मर्दानी खेळही

कंदलगाव - जग अत्याधुनिक झाले तर घरी मुलगी जन्माला आली की काहीसा नाराजीचा सूर अद्याप असतो, मात्र पाचगावमधल्या पाटील कुटुंबीयांनी एक आगळ्या

वेगळ्या उपक्रमातून आदर्श पायंडा आहे. या कुटुंबीयांत जन्माला आलेल्या कन्येची शनिवारी चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत स्वागत केले. मिरवणुकीत लहान मुलांच्या हातात ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असे फलक देऊन समाजात जनजागृतीही केली. सॉफ्टवेअर अभियंते असलेले गिरीश आणि मनीषा पाटील यांना पहिली मुलगी झाली.

त्या आनंदात पाटील कुटुंबीयांनी आज इराची हत्तीवरून मिरवणूक काढत तसेच ढोल ताशाच्या गजरात व मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकासह तिचे स्वागत केले. ‘मुलींना जन्म घेऊ द्या, त्यांना मुक्तपणे शिकू द्या’ अशी जागृती केली. गिरीश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीचे केलेले स्वागत पाहून रहिवासीही भारावून गेले. ओम पार्क शांतिनगर येथून ते ढेरे हॉल या मार्गावर ही मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात नातेवाईक, मित्र मंडळी व शेजारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

मुलींचा जन्मदर कमी आहे. आम्हाला पहिलीच मुलगी झाल्याने खूप आनंद झाला. पालकांनी सर्व मुलींना समान वागणूक द्यावी. त्यांना खूप शिकवावे.

- गिरीश पाटील, इराचे वडील

मी उच्चशिक्षित आहे. मुलगा-मुलगी असा भेदभाव नाही. इरा हे सरस्वतीचे नाव आहे. तिला उच्चशिक्षित करणार आहे.

- मनीषा पाटील, इराची आई

टॅग्स :Solapur