
Solapur : आगामी निवडणुकीत भगवाच फडकावा
सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांनी केले.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोलापूर शहर युवा सेनेच्यावतीने सोलापुरात विविध ठिकाणी युवा सेनेच्या एकूण ५ शाखांचे उद्घाटन युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सोलापूर संपर्कप्रमुख उत्तम आयवळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेसाठी आज संघर्षाची लढाई सुरू आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र शिवसेनामय वातावरण निर्माण होणार आहे. या निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर शिवसेनेला निश्चितच यश मिळेल यात शंका नाही, असेही राज्य विस्तारक आयवळे यावेळी बोलताना म्हणाले.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, शहर प्रमुख विठ्ठल वानकर, जिल्हा समन्वयक मुनीनाथ कारमपुरी, शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे, जिल्हा कॉलेज कक्ष प्रमुख तुषार आवताडे, शहरप्रमुख प्रथमेश तपासे, अनिरुद्ध दहिवडे, ऋषिकेश पवार, ओंकार काटकर, भीमाशंकर शिंगनाळे,
धनराज थोरात, प्रेमराज शिखरे, अनिकेत देशमुख, श्रेयस सुंटनुरे, नागेश शिंगनाळे, यशराज व्हनमाने, समर्थ मोहिते, आदित्य शिंगनाळे, अजय कारमपुरी, नवीन गज्जेली, राहुल उसाकोयल, महेश काशीकर, दशरथ चव्हाण, रवींद्र पवार यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.
या शाखांचे झाले उद्घाटन
प्रभाग १२ मधील न्यू पाश्चा पेठ विजयनगर, शाखा क्र. २ - वालचंद-हिराचंद नेमचंद महाविद्यालय, सोलापूर, शाखा क्र. ३ - वि. गु. शिवदारे महाविद्यालय, सोलापूर, शाखा क्र. ४ - ए. जी. पाटील महाविद्यालय, सोलापूर, शाखा क्रमांक ५ - प्रभाग क्रमांक २६, साक्षी पार्क सैफुल.
प्रभागनिहाय युवा सेना
युवकांचे प्रश्न सोडवून संघटन मजबूत करण्यासाठी सोलापूर शहरातील प्रत्येक प्रभागात आगामी काळात युवा सेनेच्या शाखांची स्थापना करण्यात येणार असल्याचे युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी सांगितले.