Solapur : ग्रामपंचायतच्या निवडणूकीत गुलाल...परडी अन् भंडारा उचलुन मते फिक्स

तालुक्यात 30 ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली
 grampanchayats
grampanchayats sakal

करमाळा : करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू असुन ग्रामपंचायत निवडणुकीतून आपल्याच गटाची सत्ता आली पाहिजेत यासाठी सर्वसामान्य गोरगरीब मतदारांना वेगवेगळी आमशे दाखवत गुलाल उचल... भंडारा उचल.. देवीची परडी उचल.. शपथ घे..माळ उचल... म्हसोबाची शपथ घे असे म्हणत मते फिक्स करण्याचा प्रचार सुरू झाला.हा फॉर्मुला राबवण्यात कोणताही गट मागे राहिलेला नाही.

तालुक्यात 30 ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत आपलाच पॅनल निवडून आला पाहिजेत यासाठी कार्यकर्ते इर्शेला पेटल्याचे दिसून येत आहे. या इर्सेतूनच सर्वसामान्य लोकांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी  गुलाल ,भंडारा ,परडी,माळ,शपथा हा फॉर्म्युला राबवण्यास सुरुवात केली आहे.

बुधवार ता.7 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्यात मुदत संपताच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने गाव गावच्या नेतेमंडळींनी आपलाच पॅनल निवडून यावा यासाठी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच निवडून येण्यासाठीचे सर्व फॉर्मुले वापरण्यास सर्वच गटातटांनी सुरुवात केल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे.

निरपेक्ष वातावरणात मतदारांनी मतदान केले पाहिजे यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुरू असली तरी देखील गुलाल बुक्का कुंकू परडी उचलणे हा फॉर्म्युला गावोगावी जोरदार सुरू झाला.

निवडणूक लागलेली गावे

वरकाटणे , कात्रज , गोयेगाव , हिंगणी  , पोमलवाडी , रिटेवाडी , शेलगाव वा. , जिंती  , मांजरगाव , पोंधवडी  , कोंढारचिंचोली  , वाशिंबे , कुंभारगाव , कामोणे , दहिगाव , देलवडी , दिवेगव्हण, तरटगाव , मोरवड , खडकी , सोगाव , विहाळ , भिलारवाडी , खातगाव , पोफळज , पारेवाडी, टाकळी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध लिंबेवाडी,वंजारवाडी,अंजनडोह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com