स्टार्ट अप :‘एमपीएससी’चा नाद सोडला, ‘कस्तुरी गोल्ड’चा जन्म झाला

संतोष सातपुतेंचे शेंगदाणा तेल निर्मितीतून उद्योगविश्वात पदार्पण
स्टार्ट अप :‘एमपीएससी’चा नाद सोडला, ‘कस्तुरी गोल्ड’चा जन्म झाला
स्टार्ट अप :‘एमपीएससी’चा नाद सोडला, ‘कस्तुरी गोल्ड’चा जन्म झाला

सोलापूर : महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा परीक्षेचे अनेक युवकांना आकर्षण असते. वर्षानुवर्षे परीक्षा देऊनही न मिळणारे यश, वाढत जाणारे वय, उच्चशिक्षण घेऊनही घरच्यांची न होणारी अपेक्षापूर्ती हा अनेक युवकांसमोरील सध्याचा मोठा प्रश्‍न आहे. सोरेगावमधील व्हीव्हीपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर एमपीएससीची तयारी करणाऱ्या संतोष सातपुते यांनी स्पर्धा परीक्षेचा नाद सोडत उद्योजक होण्यासाठी धाडसी पाऊल टाकले आहे.

लोको पायलट आणि पीएसआयची संधी अवघ्या दोन गुणांनी हुकली. त्यानंतर संतोष सातपुते यांनी पुन्हा परीक्षेची तयारी केली. कोरोनामुळे एप्रिल २०२० मध्ये होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द झाली. परीक्षा लांबणीवर पडल्याने स्पर्धा परीक्षेचा विचार सोडत संतोष सातपुते यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. दैनंदिन जीवनात ज्या वस्तू रोज लागतात, त्या वस्तू निर्मितीचा उद्योग करण्याचा निश्‍चय त्यांनी केला. त्यातून खाद्य तेलाचा पर्याय समोर आला. आपल्याकडे शेंगदाणे सहज उपलब्ध असल्याने शेंगदाण्यापासून तेल निर्मितीचा व्यवसाय सातपुते यांनी निवडला. त्यांचे बंधू बालाजी सातपुते यांची त्यांना मोलाची साथ मिळाली.

स्टार्ट अप :‘एमपीएससी’चा नाद सोडला, ‘कस्तुरी गोल्ड’चा जन्म झाला
"राजकारणात माणसं कमविण्यासाठी आलोय, पद नशिबाने मिळेल"

एस.एस. कस्तुरी गोल्ड नावाने सौंदणे (ता. मोहोळ) येथे सातपुते बंधू यांनी शेंगदाणा तेल निर्मितीचा व्यवसाय वर्षापूर्वी सुरू केला. मोहोळ परिसरासह तालुक्‍यात आज एस.एस. कस्तुरी गोल्डने बाजारपेठ काबीज केली आहे. या उद्योगातून कुटुंबातील सहा जणांना घरीच रोजगाराची संधीही मिळाली आहे. वडिलोपार्जित अडीच एकर जमीन असल्याने उद्योग व्यवसायासाठी आवश्‍यक असलेले भांडवल जमविण्याचे मोठे आव्हान संतोष सातपुते व बालाजी सातपुते या बंधूंपुढे होते.

गावात वडिलांची भिशी होती. ती भिशी घेऊन त्यातून तीन लाख रुपयांची जुळवाजुळव झाली. मित्राकडून नातेवाइकांकडून उसने पैसे घेऊन शेंगदाणा तेल निर्मितीची पाच लाख रुपयांची मशीन त्यांनी विकत घेतली. त्यातून शेंगदाणा तेल निर्मितीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. तेल निर्मितीनंतर राहिलेल्या चोथ्यापासून शेंगदाणा पेंड तयार होते. या पेंडीचा उपयोग घरातील दुभत्या जनावरांसाठी होऊ लागला आहे. रोज दोनशे लिटर तेल निर्मितीचा हा छोटेखानी प्रकल्प संतोष सातपुते व बालाजी सातपुते आज यशस्वीपणे सांभाळत आहेत.

स्टार्ट अप :‘एमपीएससी’चा नाद सोडला, ‘कस्तुरी गोल्ड’चा जन्म झाला
सोलापूर पोलिस आयुक्‍तालयाचा होणार विस्तार: गृहराज्यमंत्री

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय, उद्योगात उतरावे असे अनेकजण सांगतात. प्रत्यक्षात मात्र व्यवसायासाठी आवश्‍यक असलेल्या परवानग्या मिळविण्यात आणि भांडवल जमविण्यातच तरुणांची मोठी शक्ती खर्च होते. या सर्व प्रक्रियेत अनेक युवक नाउमेद होतात. युवकांकडे कल्पकता आणि इच्छाशक्ती आहे. या कल्पकतेला आणि इच्छाशक्तीला सहजपणे आर्थिक पाठबळाची जोड मिळावी. शासकीय प्रक्रिया सुलभ करण्याची आवश्‍यकता आहे.

- संतोष सातपुते, एस.एस. कस्तुरी गोल्ड, सौंदणे (ता. मोहोळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com