सोलापूर : साखर कारखानदारीला लागले इथेनॉलचे वेध

येत्या हंगामात विठ्ठल, फॅबटेक, आदिनाथ सुरू होण्याची शक्‍यता
 sugar industry
sugar industrysakal

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा म्हणून ऊस शेती आणि साखर कारखानदारीकडे पाहिले जाते. कोरोना महामारीच्या संकटात साखर कारखानदारीने सॅनिटायझर निर्मितीतून उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधला. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे महामारीच्या भीषण संकटात कल्पकता वापरत कारखान्यांनी महामारी कमी करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारीला आता इथेनॉल निर्मिती खुणावू लागली आहे. येत्या गळीत हंगामात पासून इथेनॉलचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे.

 sugar industry
राजकारणात तू कधी उतरणार? बहिणीसाठी काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या सोनू सूदने दिलं उत्तर

मंगळवेढा तालुक्‍यातील युटोपियन शुगर आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील जय हिंद शुगर यांनी इथेनॉल निर्मितीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सलग दोन वर्षे चांगला पाऊस पडल्याने उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारीला यंदाचा व आगामी गळित हंगाम चांगला मानला जात आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्याची संख्या वाढली असल्याने तसेच सोलापूर शेजारी असलेल्या साखर कारखान्यांमुळे आता कितीही ऊसाची लागण झाली तरीही अतिरिक्त उसाचा प्रश्‍न भेडसावण्याची शक्‍यता आता जवळपास संपल्यात जमा आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना व चांदापुरी येथील पूर्वीचा शेतकरी साखर कारखाना आता ओंकार शुगरने सुरू केला आहे. ही जमेची बाजू मानली जात आहे. आगामी हंगामात पंढरपूर तालुक्‍यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मंगळवेढा तालुक्‍यातील फॅबटेक साखर कारखाना सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न हा निर्माण होण्याची फार कमी शक्‍यता आहे. साखरेला चांगला दर मिळाला तर साखर कारखानदार स्वतःहून एफआरपी देतात हा अनुभव असल्याने साखरेचा दर कसा राहतो? त्यावर एफआरपीचे गणित अवलंबून असणार आहे.

 sugar industry
Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद

ठळक

  • आतापर्यंत १५४. ६७ लाख टन उसाचे गाळप

  • आतापर्यंत १३८. ९४ लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन

  • साखर कारखानदारीतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

  • कारखाना परिसरातील चित्र बदलले, व्यवसायाच्या संधी उपलब्ध

  • अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारण्यावर कारखानदारांचा भर

देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत. यावर्षीही मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण झाली असल्याने आगामी गळित हंगामात साखर कारखान्यांना मुबलक ऊस उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. कारखानदारीच्या स्पर्धेत शेतकऱ्यांना ऊस घालण्यासाठी विविध पर्याय आता तयार झाले आहेत.

- सचिन जाधव, कार्यकारी संचालक, जकराया शुगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com