भविष्यात ऊस हे पीक उपपदार्थ निर्मितीत गणले जाईल - खा. धनंजय महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Mahadik

सध्या इथेनॉल, वीज निर्मिती या वस्तू कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीत गणल्या जातात, मात्र भविष्यात ऊस हे उपपदार्थ निर्मितीत गणले जाईल, ऊस हे शाश्वत पीक आहे.

भविष्यात ऊस हे पीक उपपदार्थ निर्मितीत गणले जाईल - खा. धनंजय महाडिक

मोहोळ - सध्या इथेनॉल, वीज निर्मिती या वस्तू कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीत गणल्या जातात, मात्र भविष्यात ऊस हे उपपदार्थ निर्मितीत गणले जाईल, ऊस हे शाश्वत पीक आहे. त्याकडे शेतकऱ्यांनी वळावे ज्यादा उत्पाद वाढीसाठी उसाचे वाण बदलावे. येत्या गळीत हंगामात कारखान्याने अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, दिपवाळीसाठी प्रत्येक सभासदाला 25 किलो साखर देण्यात येणार आहे. येत्या गळीत हंगामात को 86032 या वाणाच्या उसाला प्रति टन शंभर रुपये जादा दर देण्यात येणार असून, येत्या 25 तारखे पर्यंत राहिलेली ऊसाची सर्व एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची 47 वी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्यावेळी खासदार महाडिक बोलत होते.अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक सुर्यकांत शिन्दे यांनी केले.

खासदार महाडिक पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपूर्वी दुष्काळ आल्याने कारखान्याला आर्थिक अडचणी आल्या. गेल्या वर्षी यंत्रणेस पैसे द्यायला उशीर झाला त्यामुळे ही अडचण झाली, मात्र चालू ऊस गळीत हंगामात नियोजन केले आहे. त्या वेळेच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे ही सर्वच साखर कारखान्यांना अडचणी आल्या. केंद्रात नव्याने सहकार खाते निर्माण झाले आहे. त्या खात्याचे मंत्री तथा गृहमंत्री अमित शहा यांनी कारखानदाराच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे दिलासा मिळाला आहे. अडचणीत अडचण म्हणून कारखान्याची मोलॅसीस साठपाची टाकी फुटल्याने मोलॅसीस व साखर असे मिळून सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्याचाही परिणाम कारखान्याच्या अर्थकारणावर झाला. वेळेत कारखान्याला केंद्राचे पैसे उपलब्ध न झाल्याने दोन लाख मेट्रिक टन गाळपही कमी झाले.

सध्या ऊस तोडणी कामगारांची अडचण येत आहे. चालू वर्षी कारखान्याने दहा ऊस तोडणी यंत्राबरोबर करार केला आहे. भविष्यात शेतकऱ्यांनीच यंत्रे खरेदी करावीत त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे मिळून 40 टक्के अनुदान मिळणार आहे. प्रत्येक वर्षी ऊसाची एफआरपी वाढत चालली आहे. मात्र, साखरेचे दर वाढले नाहीत त्यासाठी साखर दरवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे सर्वांच्या सहकार्याने देण्याचा विचार असल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितले. शेती व सुरक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांना सेवेत लवकरच कायम करण्यात येणार असून, कामगारांना 12 टक्के पगारवाढ देण्यात येणार असुन दिपवाळीसाठी बोनस ही देण्यात येणार असल्याचेही खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर विश्वराज महाडिक, कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, संचालक राजेंद्र टेकळे, दिलीप रणदिवे, दादा शिंदे, उत्तम मुळे अनिल गवळी, धोंडीबा उन्हाळे, राजू बाबर, पांडुरंग ताठे, झाकीर मुलाणी, शेती अधिकारी माणिक पाटील, चीफ अकाउंटंट नामदेव इंगळे, तुषार चव्हाण, माणिक बाबर, पवन महाडिक, भीमा वसेकर ,संग्राम चव्हाण, महादेव देठे, सुनील चव्हाण, शिवाजी गुंड, सुरेश शिवपूजे, भाऊसाहेब जगताप, प्रभाकर देशमुख, चंद्रसेन जाधव आधी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sugarcane Will Be Considered As By Product Crop In Future Mp Dhananjay Mahadik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..