उन्हाळ्यात झाडांच्या संगोपनासाठी झटणारे निसर्गमित्र लेकरागत जोपासली 700 झाडे

'झाडे लावा झाडे जगवा' हि घोषणा देत शासनाकडुन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था, ग्रुपच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड
summer 700 trees cultivated nature lovers
summer 700 trees cultivated nature lovers sakal

उपळाई बुद्रूक : पावसाळा आला की, दरवर्षी 'झाडे लावा झाडे जगवा' हि घोषणा देत शासनाकडुन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था, ग्रुपच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येते. परंतु संगोपनाची जबाबदारी कोणीही घेत नाही. त्यामुळे हि झाडे उन्हाळ्यात पाण्याअभावी जळून जातात. परंतु याला अपवाद उपळाई खुर्द (ता.माढा) येथील निसर्गमित्र फाऊंडेशन असुन, गेली तीन वर्षापासून झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन, भर उन्हाळ्यात नेटके नियोजन करत झाडे जगवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये वयोवृद्ध शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे.

झाडे जगवणे हि काळाची गरज असुन, शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीवर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु वृक्ष संगोपन होत नसल्या कारणाने, पावसाळ्यात लावलेली झाडे मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जळून जातात. पुन्हा त्याच खड्यांनी पावसाळ्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम केला जातो. वर्षानुवर्षे असेच चालू आहे. परंतु झाडांचे संगोपन मात्र क्वचितच झालेले पहायला मिळते. त्यातीलच एक म्हणजे उपळाई खुर्द येथील महादेव मंदिर परिसरात निसर्गमित्र फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आलेली वनराई. झाडांची गरज ओळखून या फाउंडेशनने गेली तीन वर्षांपूर्वी जवळपास गावात 700 च्या आसपास झाडे लावली आहेत. नुसते झाडे लावलीच नाहीतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी देखील घेतली आहे.

बारा महिने लेकरागत या झाडाचे संगोपन या फाउंडेशनचे सदस्य करत असतात. उन्हाळ्याच्या दिवसात झाडांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी विशेष काळजी घेतात. एक- एक रूपया गोळा करून पाण्याची सोय करतात. या फाउंडेशन चे सदस्य सर्वच शेतकरी असुन, यात वयोवृद्ध शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे. यंदाचा उन्हाळा तीव्र असल्याने, येथील फाऊंडेशनच्या सदस्यांनी झाडांना पाणी कमी पडू नये यासाठी रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी प्रयत्न करतात. गेली दोन वर्षात या झाडांचे व या सदस्यांचे एक वेगळेच नाते तयार झाला असून, एक दिवस देखील या झाडांकडे दुर्लक्ष करत नाहीत. झाडांबाबत काही प्रश्न असेल तर सर्वजण तातडीने एकत्र येऊन त्यावर उपाययोजना करतात. झाडांबाबत एवढे जागरूक असलेले या परिसरातील हे एकमेव फाऊंडेशश असुन, त्यांनी झाडे संगोपनाचा घेतलेला वसा निश्चितच समाजहिताचा आहे. सध्या कडक उन्हात देखील हि झाडे टवटवीत व हिरवेगार दिसत आहेत. उपळाईच्या या शेतकऱ्यांची झाडे लागवडीचा व संगोपनाची आदर्श संकल्पना इतर गावांनी घ्यायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com