क्रेनखाली चिरडून ब्रह्मपुरीच्या माजी उपसरपंचाचा मृत्यू!

क्रेनखाली चिरडून ब्रह्मपुरीच्या माजी उपसरपंचाचा मृत्यू! गावावर शोककळा
क्रेनखाली चिरडून ब्रह्मपुरीच्या माजी उपसरपंचाचा मृत्यू!
क्रेनखाली चिरडून ब्रह्मपुरीच्या माजी उपसरपंचाचा मृत्यू!Canva
Summary

दसरा सणाच्या निमित्त पूजेसाठी फुले आणण्यासाठी निघालेले माजी उपसरपंच सुनील ऊर्फ पप्पू पाटील यांना क्रेन चालकाने धडक दिल्याने, चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ब्रह्मपुरी (सोलापूर) : दसरा सणाच्या निमित्त पूजेसाठी फुले आणण्यासाठी निघालेले माजी उपसरपंच सुनील ऊर्फ पप्पू पाटील (Sunil Patil) यांना क्रेन चालकाने धडक (Accident) दिल्याने, चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील माचणूर येथील चौकात घडली. त्यामध्ये एक जणाला किरकोळ दुखापत झाली असून, या घटनेने विजयादशमीच्या सणा दिवशीच ब्रह्मपुरी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन संतप्त ग्रामस्थांच्या भावना समजून घेऊन शांततापूर्वक परिस्थिती हाताळली.

क्रेनखाली चिरडून ब्रह्मपुरीच्या माजी उपसरपंचाचा मृत्यू!
राष्ट्रवादीचे माजी महापौर सपाटेसह मुलाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

ब्रह्मपुरी येथील माजी माजी उपसरपंच सुनील ऊर्फ पप्पू पाटील (वय 45) व राजेंद्र दगडू पुजारी (वय 51) हे दोघे दसरा सणानिमित्त दुचाकी गाडीवर पूजेसाठी फुले आणावयास बेगमपूर येथे निघाले होते. माचणूर चौकातून बेगमपूरकडे निघालेल्या क्रेनचा त्यांना पाठीमागून धक्का लागल्याने दोघे खाली पडले. अपघात झाल्याने क्रेनचालक घाबरून क्रेन तसाच सोडून पळून जात असताना क्रेनचे चाक डोक्‍यावरून गेल्याने माजी उपसरपंच पप्पू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दुचाकी चालवणारे राजेंद्र दगडू पुजारी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गावातील जमाव संतप्त झाला होता. क्रेन चालकच्या बिफिकिरीमुळे उपसरपंच सुनील ऊर्फ पप्पू पाटील यांना जीवास मुकावे लागले. राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या ब्रह्मपुरी, माचणूर व बेगमपूर येथील चौकांमध्ये सतत वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी अनेक वाहने बेफिकिरीने चालविली जात असून सतत काही ना काही दुर्घटना घडत असूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. आता या दुर्घटनेमुळे या भागातील जनतेने संताप व्यक्त केला आहे.

क्रेनखाली चिरडून ब्रह्मपुरीच्या माजी उपसरपंचाचा मृत्यू!
केवळ 69 हजार किमतीची स्टायलिश ऍम्पीयर मॅग्नस एक्‍स ई-स्कूटर लॉंच!

बेगमपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश पाटील यांचे सुनील पाटील हे चिरंजीव होते. सुनील पाटील यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com