मंगळवेढ्यात उत्पादकता वाढीसाठी कृषी खाते बियाणे देणार

मंगळवेढ्यात उत्पादकता वाढीसाठी कृषी खाते बियाणे देणार

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजरी, तूर, उडीद आदी पिकांची उत्पादकता वृद्धीसाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी दिली. (taluka agriculture officer umesh shrikhande informed that a demonstration was organized to increase productivity in mangalwedha)

मंगळवेढ्यात उत्पादकता वाढीसाठी कृषी खाते बियाणे देणार
पंढरपुरात ठाकरे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके

तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र एक लाख 14 हजार 161 हेक्‍टर असून खरीप पिकाखालील गतवर्षीच्या क्षेत्र तीस हजार 272 हेक्टर पैकी बाजरी खालील क्षेत्र 12753 हेक्टर, मका सहा हजार तीनशे हेक्टर, तूर 6240 हेक्टर, सूर्यफूल 2700 हेक्टर, कांदा 1572 हेक्टर, मूग 519 हेक्टर, उडीद 182 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

मंगळवेढ्यात उत्पादकता वाढीसाठी कृषी खाते बियाणे देणार
लोकवर्गणीतुन साकारली कामती बुद्रुक येथील पोलिस ठाण्याची इमारत

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी हंगाम पूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. दमदार पावसाच्या प्रतीक्षेनंतर पेरणीसाठी लगबग सुरू होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत तालुक्यात बाजरीसाठी 22 प्रकल्पातून प्रति गाव 25 शेतकरी प्रति एक एकर याप्रमाणे 25 एकर क्षेत्रावर बाजरीचे ए बी पी सी 4-3 या वाणाचे 825 किलो बियाणे 220 हेक्टर क्षेत्रावर पेरणीसाठी दिले जाणार आहे. उडीद पिकासाठी 2 प्रकल्पापासून 50 शेतकऱ्यांना 300 किलो बियाणे 20 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. तसेच तुर या पिकासाठी चार प्रकल्प असून 100 शेतकऱ्यांसाठी 600 किलो बियाणे 40 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे.

मंगळवेढ्यात उत्पादकता वाढीसाठी कृषी खाते बियाणे देणार
'केस मिटवून घ्या, नाही तर कोर्टात या'; कोरोनाच्या महामारीत 'बहुरुपी' अडचणीत

ज्यांनी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. त्यांना वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रात्यक्षिके नसलेल्या गावांसाठी ऑफलाईन अर्ज करणाऱ्यांसाठी 2925 किलो बाजरीचे बियाणे ए बी पी सी 4-3 या वाणाचे बियाणे उपलब्ध होणार असून 45 रुपये प्रति (1.5 किलोची) बॅग अनुदान वजा जाता 51 रुपये परमिट घेऊन भरल्यास दीड किलो बियाणे उपलब्ध होणार आहे. परमिटसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. 2 दिवसात परमिटवरील बियाण्यासाठी कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज करावे.

मंगळवेढ्यात उत्पादकता वाढीसाठी कृषी खाते बियाणे देणार
हन्नुर येथे विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू

कृषि विभागामार्फत हुमणी नियंत्रण जनजागृती माध्यमातून हुमणी प्रकाश सापळे एरंडी आंबवण सापळे वापर बाबत प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. तसेच घरगुती बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके, तसेच पीक कीड रोग मुक्त ठेवण्यासाठी, रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी, जिवाणू बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके, प्रत्येक गावात घेण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बिज प्रक्रीया करूनच पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषीअधिकारी श्रीखंडे यांनी केले. (taluka agriculture officer umesh shrikhande informed that a demonstration was organized to increase productivity in mangalwedha)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com