प्रभागातील कोरोनाग्रस्तांसाठी नगरसेविकेचा पुढाकार ! उभारलंय ऑक्‍सिजनयुक्त कंटेनर कोव्हिड सेंटर !

प्रभागातील कोरोना रुग्णांसाठी नगरसेविकेने कंटेनर कोव्हिड सेंटर सुरू केलंय
Covid Center
Covid Center

सोलापूर : शहरातील कोरोना प्रादुर्भावावर मात करण्यासाठी ऑक्‍सिजनयुक्त कंटेनर कोव्हिड सेंटरची सोय नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांसाठी हा उपक्रम असल्याची माहिती नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिली.

प्रभाग कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी गुरुनानक चौक परिसरातील ऑफिसर्स क्‍लबसमोर असलेल्या संस्मरण उद्यानाच्या बाहेरील मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला कंटेनर कोव्हिड सेंटर उभारले आहे. हे कंटेनर संपूर्ण वातानुकूलित असून, या ठिकाणी 24 तास डॉक्‍टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ बेडचे ऑक्‍सिजनयुक्त हे कंटेनर कोव्हिड सेंटर सोमवारपासून कार्यान्वित होणार आहे.

Covid Center
सोलापूरला "बाप'च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध ! हेवेदावे विसरून आतातरी सर्वपक्षीय नेते एकत्र येतील का?

नगरसेवक फंडातून सुमारे 15 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना ऑक्‍सिजनबरोबरच औषध- गोळ्यासुद्धा मोफत देण्यात येणार आहेत. अमरदीप कन्स्ट्रक्‍शनचे सलीम शेख यांनी कमी कालावधीत या कंटेनर हॉस्पिटलची निर्मिती केली आहे.

महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शुक्रवारी दुपारी या वातानुकूलित कंटेनर कोव्हिड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी म्हटले, की पटेल यांनी राबविलेली ही संकल्पना अत्यंत चांगली आहे. प्रत्येक प्रभागात असे कंटेनर कोव्हिड सेंटर उभारले तर मोठ्या हॉस्पिटलवरील ताण कमी होण्यास निश्‍चित मदत होईल.

Covid Center
लोकसंख्या 46 लाख अन्‌ व्हेंटिलेटर 275 ! जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अपुरीच

शहरात कोरोना रुग्ण आणि त्याचबरोबर मृतांचा वाढता आकडा चिंताजनक बनला आहे. ऑक्‍सिजन बेड शिल्लक नसल्यामुळे अनेक जण दगावत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने प्रभागातील नागरिकांच्या मदतीला धावून येणे आपण आपले कर्तव्य समजतो आणि याच भावनेतून प्रभागामधील नागरिकांसाठी कंटेनर कोव्हिड सेंटर उभारल्याचे नगरसेविका पटेल यांनी सांगितले.

कंटेनर कोव्हिड सेंटरची वैशिष्ट्ये

या सेंटरमध्ये एकूण आठ बेड आहेत, ज्यामध्ये चार बेड ऑक्‍सिजनयुक्त तर चार बेड अन्य रुग्णांवर उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. एका कंटेनरमध्ये ओपीडीसह चार बेड तर दुसऱ्या कंटेनरमध्ये ऑक्‍सिजन बेड तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी येणारे एम. डी. मेडिसिन डॉक्‍टर तसेच नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वातानुकूलित रूम तयार करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णांना संडास आणि बाथरूमची व्यवस्था असून गरम पाण्यासाठी गिझरचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. मुबलक पाण्याची व्यवस्था सुद्धा टाक्‍यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. प्रकाश यावा म्हणून एलईडी लाइट्‌स लावण्यात आले आहेत. तर ऑक्‍सिजनचे सिलिंडर ठेवण्यासाठी कंटेनरच्या बाहेर सुरक्षित अशा प्रकारचा बॉक्‍स तयार करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com