कोरोना मृतांची चार हजारांकडे वाटचाल ! जिल्हा प्रशासन अपयशी

जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या चार हजारापर्यंत पोचत आहे
Corona
CoronaMedia Gallery
Summary

ग्रामीण भागात दररोज आठशेच्या सरासरीने रुग्ण आढळत असून मृत्यूची संख्याही लक्षणीय आहे. तरीही टेस्ट नेमके कमी का झाले, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेतील संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 21 मे ते 1 जूनपर्यंत ग्रामीण भागात त्याहून अधिक कडक निर्बंध लागू केले. तरीही, कोरोनाचा संसर्ग व मृत्यू रोखण्यात यश मिळाले नाही. मृत्यूदर (Mortality rate) अजूनही चिंताजनकच आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील दोन हजार 585 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून दररोज सरासरी 22 ते 24 रुग्णांचा मृत्यू होत आहे. रविवारी शहर- जिल्ह्यात 744 रुग्ण वाढले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. (The death from corona in the Solapur district has reached four thousand)

Corona
पहिल्या लाटेत गाव कोरोनामुक्त ठेवणारा पोलिस पाटील दुसऱ्या लाटेत हरला!

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील किमान 20 संशयितांची कोरोना टेस्ट करण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आता कडक निर्बंधामुळे बहुतेक लोक गावाबाहेर जात नाहीत. या पार्श्‍वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक दहा व्यक्‍तींची कोरोना चाचणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉक्‍टरांचा संप तर कधी रॅपिड अँटिजेनचे किट संपल्याची कारणे देत आता टेस्टिंग कमी केल्याचीही चर्चा आहे. ग्रामीण भागात दररोज आठशेच्या सरासरीने रुग्ण आढळत असून मृत्यूची संख्याही लक्षणीय आहे. तरीही टेस्ट नेमके कमी का झाले, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Corona
तब्बल 20 तासांनंतर चिमुकल्यांचे मृतदेह शोधण्यात यश; लवंगी गावावर शोककळा

रविवारी अक्‍कलकोटमध्ये 29, मंगळवेढ्यात 31, सांगोल्यात 55 रुग्ण आढळले असून त्या ठिकाणी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर करमाळ्यात 43 रुग्ण वाढले असून दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. माढ्यात 135 रुग्ण वाढले असून तालुक्‍यातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माळशिरसमध्ये सर्वाधिक 150, मोहोळमध्ये 32, पंढरपुरात 105 रुग्ण वाढले असून या तालुक्‍यातील प्रत्येकी चौघांचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापुरात पाच तर दक्षिण सोलापुरात 18 रुग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यातील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती

  • एकूण टेस्टिंग : 14,37,357

  • पॉझिटिव्ह रुग्ण : 1,51,137

  • मृत्यू : 3,951

  • उपचार घेणारे रुग्ण : 7,103

शहरात प्रभाग 23 व 24 मध्ये सर्वाधिक रुग्ण

शहरातील बहुतेक प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून काही प्रभाग मागील काही दिवसांपासून पूर्णपणे कोरोनामुक्‍त झाले आहेत. रविवारी प्रभाग क्र. 8, 9, 14, 16, 22, 25 या प्रभागात प्रत्येकी एक तर प्रभाग क्रमांक 23 मध्ये सर्वाधिक पाच आणि प्रभाग 24 मध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरातील एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण प्रभाग क्र. 23 व 24 मध्ये आढळतात. तरीही, त्या ठिकाणी महापालिकेकडून काहीच ठोस उपाययोजना होत नसल्याची स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com