सोलापूरची कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल! आता फक्‍त 701 अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण

सोलापूरची कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल! आता फक्‍त 701 अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण
Covid-19
Covid-19Gallery
Summary

शुक्रवारी (ता. 15) ग्रामीणमध्ये 47 नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आता आटोक्‍यात येत असून, 1 ते 15 ऑक्‍टोबर या काळात ग्रामीणमध्ये एक लाख 61 संशयितांमध्ये एक हजार 450 तर, शहरातील 8 हजार 281 संशयितांमध्ये 46 व्यक्‍ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील 15 दिवसांत ग्रामीणमधील 57 तर शहरातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहर- ग्रामीणमध्ये कोरोना संशयितांच्या चाचण्यांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता. 15) ग्रामीणमध्ये 47 नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. शहरात अवघा एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील 26 लाख 79 हजार 988 संशयितांची तर शहरातील चार लाख 94 हजार 360 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सध्या ग्रामीणमधील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, मोहोळ या तालुक्‍यातील रुग्ण कमी झाले आहेत. शुक्रवारी या चारही तालुक्‍यात नवीन रुग्ण आढळला नाही. बार्शीत तीन, करमाळ्यात चार, माढ्यात 14, माळशिरस तालुक्‍यात सात, मंगळवेढ्यात एक, पंढरपूर तालुक्‍यात दहा आणि सांगोल्यात आठ रुग्ण वाढले आहेत. रुग्ण कमी होत असतानाच मृत्यू थांबविण्याचे प्रमुख आव्हान प्रशासनासमोर आहे.

Covid-19
क्रेनखाली चिरडून ब्रह्मपुरीच्या माजी उपसरपंचाचा मृत्यू!

'म्युकरमायकोसिस'चे आतापर्यंत जिल्ह्यात 696 रुग्ण आढळले असून, त्यातील तब्बल 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या दहा रुग्णांवर उपचार सुरू असून, उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना होण्यापूर्वी व कोरोनातून बरे झाल्यानंतरही संबंधितांनी काही त्रास होत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास कोरोनापासून निश्‍चितपणे दूर राहाल, कोरोनावरील प्रतिबंधित ल टोचून सुरक्षित व्हा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

अ‍ॅक्‍टिव्ह रुग्णांमध्ये घट

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्‍कलकोट, मंगळवेढा, सांगोला या तालुक्‍यातील रुग्णसंख्या खूपच कमी झाली आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील एक लाख 73 हजार 540 रुग्णांपैकी एक लाख 69 हजार 271 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. दुसरीकडे शहरातील 29 हजार 343 रुग्णांमधील 27 हजार 865 रुग्ण बरे झाले आहेत. आता शहरात 30 तर ग्रामीणमध्ये 671 रुग्ण शिल्लक असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com