शेतकऱ्याचा मुलगा ‘एमपीएससी’तून पहिल्याच प्रयत्नात झाला मंत्रालयात अधिकारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सहायक कक्ष अधिकारी पदाच्या विभागीय परीक्षेत कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सुधाकर पंडित कोरे हा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. पहिल्याच प्रयत्नात सुधाकरने यशाला गवसणी घातली आहे.
sudhakar kore
sudhakar koresakal

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सहायक कक्ष अधिकारी पदाच्या विभागीय परीक्षेत कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सुधाकर पंडित कोरे हा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. पहिल्याच प्रयत्नात सुधाकरने यशाला गवसणी घातली आहे.

sudhakar kore
चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरीच केला अभ्यास! दुसऱ्याच प्रयत्नात ‘युपीएससी’त पास

कुंभारी येथे थोडक्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविताना पंडित कोरे यांनी मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले. सुधाकर हा बालपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण मंद्रूप येथेच झाले. त्यानंतर अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी तो शहरात आला. कुचन ज्युनिअर कॉलेजमध्ये त्याचे बारावीपर्यंचे (एमसीव्हीसी) शिक्षण पूर्ण झाले. कुटुंबाची परिस्थिती तेवढी चांगली नसल्याने सुधाकरने व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. इंग्लिश लिटरेचरमधून पदवी घेतल्यानंतर त्याने पदव्युत्तर शिक्षण सोलापूर विद्यापीठातून पूर्ण केले. डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधून सुधाकरने पदव्युत्तर शिक्षणात विद्यापीठात पहिला क्रमांक मिळविला. पुढे त्याने विशेष प्राविण्यासह शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना काहीतरी जॉब मिळेल आणि कुटुंबाला हातभार लागेल हाच त्याचा हेतू होता.

sudhakar kore
संपानंतर लालपरीची ६१० कोटींची कमाई! दररोज २९ लाख प्रवाशांचा एसटीने प्रवास

प्राध्यापक व्हायचे होते, पण...

सुधाकर कोरे याने २०११ मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापक होण्याची वाट सुकर केली. २०१९ मध्ये तो सेट परीक्षेतही उत्तीर्ण झाला. त्याला पीएचडीसाठी फेलोशिपदेखील मिळाली. दरम्यानच्या काळात त्याला वैद्यकीय शिक्षण विभागात मंत्रालयात लिपीक पदावर नोकरी मिळाली. त्यावेळी त्याने प्राध्यापक होण्यापेक्षा एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. त्याचा एक भाऊ एलएलएम पूर्ण करून वकिलीचा व्यवसाय करणार असून दुसरा भाऊ बी-कॉमच्या अंतिम वर्षात आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एमपीएससीची जाहिरात आली आणि ६ मार्च २०२२ रोजी परीक्षा झाली. अवघ्या दोन महिन्यात त्याने परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात सहायक कक्ष अधिकारी पदाच्या विभागीय परीक्षेत राज्यातून पहिला क्रमांक पटकावला. लिपीक पदाची नोकरी सांभाळतच त्याने अभ्यास केला आणि या यशाला गवसणी घातली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com