esakal | महापालिका लावणार "त्या' पिकांचा छडा ! "समांतर'च्या नुकसानभरपाईचा मुद्दा ऐरणीवर
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका लावणार "त्या' पिकांचा छडा ! "समांतर'च्या नुकसानभरपाईचा मुद्दा ऐरणीवर

भूसंपादनासंदर्भात काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली असता त्या ठिकाणी झाडे नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब संशयास्पद व गंभीर असल्याने याचा सॅटेलाईटच्या माध्यमातून छडा लावण्याचा निर्णय झाला.

महापालिका लावणार "त्या' पिकांचा छडा ! "समांतर'च्या नुकसानभरपाईचा मुद्दा ऐरणीवर

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : उजनी- सोलापूर (Ujani Dam) समांतर जलवाहिनी घालण्याकामी पीक नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. यासंदर्भातील आकडा प्रचंड फुगल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. 26) महापालिका (Solapur Municipal Corporation) व स्मार्ट सिटी (Smart City) तर्फे करण्यात आलेल्या पाहणीवेळी एके ठिकाणी झाडेच गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे येथे याआधी कुठली पिके होती याचा छडा सॅटेलाईटच्या (Satellite) माध्यमातून लावण्यात येणार आहे. यावरून पीक नुकसान भरपाईचा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. (The issue of parallel water pipeline compensation is becoming serious)

हेही वाचा: होम आयसोलेशनमधील "तो' रुग्ण सापडलाच नाही ! उपचार करणारे डॉक्‍टरांचे तोंडावर बोट

समांतर जलवाहिनीसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाची, उजनी येथे सुरू करण्यात आलेल्या जॅकवेलच्या कामाची तसेच वरवडे टोलनाक्‍याजवळ ब्रेक प्रेशर टॅंकची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेगळे- पाटील आदी उपस्थित होते. या वेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी भूसंपादनासंदर्भात काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली असता त्या ठिकाणी झाडे नव्हती असे निदर्शनास आले आहे. ही बाब संशयास्पद व गंभीर असल्याने या ठिकाणी पूर्वी कुठले पीक होते, याचा सॅटेलाईटच्या माध्यमातून छडा लावण्याचा निर्णय घेतला. येथे कुठले पीक होते याची माहिती घेऊन शासनाला कळविण्यात येणार आहे.

हेही वाचा: कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार ! "तो' पोलिस निलंबित

या वेळी एमजेपीचे अधिकारी भांडेकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उप अभियंता, देविदास मादगुंडी, ढावरे, सहाय्यक अभियंता एजाज शेख, ड्रोण पायलट प्रवेश कसारे, मक्तेदार श्रीनिवास राव, सहाय्यक अभियंता उमर बागवान आदी उपस्थित होते.

पीक घोटाळ्याच्या संशयाला वाव

पूर्वीच्या अंदाजानुसार 55 कोटींची पीक नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते, पण ही रक्कम वाढून चक्क 130 कोटींवर गेल्याने यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचे वृत्त "सकाळ'ने गत महिन्यात दिले होते. आजच्या पाहणीत झाडे गायब असल्याचे निदर्शनास आल्याने पीक घोटाळासंदर्भात संशयाला वाव मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज निर्माण झाली आहे.