Solapur : कार्तिकीसाठी यात्रेकरू कमी आले परंतु तरीही उत्पन्न वाढले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur

कार्तिकीसाठी यात्रेकरू कमी आले परंतु तरीही उत्पन्न वाढले!

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : कार्तिकी यात्राकाळात यंदा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला विविध देणग्या, फोटो विक्री, भक्त निवास भाडे अशा सर्व माध्यमातून 1 कोटी 97 लाख 83 हजार 57 रुपये उत्पन्न मिळाले. यंदा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे यात्रेकरु अपेक्षित संख्येने येऊ शकले नाहीत परंतु तरीही मागील वर्षींच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात 1कोटी 84 लाख 89 हजार 424 रूपयांची वाढ झाली अाहे अशी माहिती प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव अाणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

कोरोनाच्या सावटामुळेसुमारे 20 महिने पंढपुरात कोणतीही यात्रा भरु शकली नव्हती. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने यंदा कार्तिकी यात्रा भरली परंतु एसटी कामगारांच्या संपाचा मात्र यात्रेवर लक्षणीय परिणाम झाला. बाजारपेठेतही अपेक्षित उलाढाल झाली नाही अाणि मंदिर समितीला देखील अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. यंदा यात्राकाळात अपेक्षेच्या तुलनेने यात्रेकरू कमी आले परंतु तरीही मागील वर्षीच्या तुलनेत मंदिर समितीचे उत्पन्न वाढले अाहे.

कार्तिकी यात्रा 2019 मध्ये मंदिर समितीला विविध माध्यमातून 2 कोटी 96 लाख 36 हजार 738 रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर कार्तिकी यात्रा 2020 मध्ये यात्रा भरू न शकल्याने अवघे 12 लाख 93 हजार 633 रुपये उत्पन्न मिळाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शऩ अजून बंद असल्याने देवांच्या अाणि श्री रुक्मिणीमातेच्या चरणाजवळ भाविकांना जाता अाले नाही. त्यामुळे देवाच्या चरणाजवळ जमा होणारी देणगी मिळू शकली नाही. यंदा लाडू प्रसाद विक्री करण्यात अाली नाही त्यामुळे त्यातूनही उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही

यंदा सर्व माध्यमातून 1 कोटी 97 लाख 83 हजार 57 रुपये उत्पन्न मिळाले.

यंदा मंदिर समितीला 5 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान यात्राकाळात मिळालेले उत्पन्न पुढील प्रमाणे - श्री अन्नछत्र देणगी 21 हजार, देणगी 59 लाख 73 हजार 612, फोटो विक्री 2 लाख 64 हजार 900, वेदांत भक्त निवास 1 लाख 63 हजार, व्हिडीअोकाॅन भक्तनिवास 1 लाख 96 हजार 350, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास 15 लाख 8 हजार 150, महानैवेद्य सहभाग योजना 1 लाख 20 हजार, मोबाईल लाॅकर जमा 3 लाख 65 हजार 600, मनीअाॅर्डर 16 हजार 846, साडी जमा 63 हजार 250, चंदन पावडर जमा 19 हजार 200, जमा पावती 7 हजार 181, हुंडी पेटी 68 लाक 48 हजार 416, परिवार देवता 32 लाख 36 हजार 792, अाॅनलाईन देणगी 9 लाख 75 हजार 559, नित्योपचार खाते जमा 3 हजार 201 अशा विविध माध्यमातून यंदा मंदिर समितीला यात्रा काळात 1 कोटी 97 लाख 83 हजार 57 रुपये उत्पन्न मिळाले.

loading image
go to top