esakal | हॅलो, तुमची तब्येत कशी आहे? महापालिकेतर्फे कोविडपश्‍चात व्यक्तींची विचारपूस
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

हॅलो, तुमची तब्येत कशी आहे? महापालिकेतर्फे विचारपूस

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

शहरात कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहित धरून आवश्‍यक पूर्वखबरदारीच्या उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत.

सोलापूर : "हॅलो, मी महापालिकेच्या कोविड कॉल सेंटरमधून बोलतेय, तुमची तब्येत कशी आहे? आरोग्यविषयक काही तक्रार आहे का?' अशी विचारणा आस्थेवाईकपणे करण्यात येत आहे. यामुळे कोविड (Covid-19) पश्‍चात व्यक्तींना दिलासा मिळत आहे. महापालिका प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल शहरवासीयांतून कौतुक होत आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहित धरून आवश्‍यक पूर्वखबरदारीच्या उपाययोजना महापालिकेकडून (Solapur Municipal Corporation)) केल्या जात आहेत. (The patients are being questioned by the Municipal Corporation after Covid)

हेही वाचा: "पीएसआय'ने स्वीकारली साडेसात लाखांची लाच! "लाचलुचपत'ने पकडले रंगेहाथ

ऑक्‍सिजनचा (Oxygen) तुटवडा भासू नये म्हणून साखर पेठेतील बॉईस हॉस्पिटलमध्ये हवेतून ऑक्‍सिजन निर्मिती करण्याचा प्लांट उभारण्यात येत आहे. याशिवाय लहान मुलांना तिसऱ्या लाटेत कोविड होण्याची अधिक शक्‍यता गृहीत धरून लहान मुलांसाठी 20 टक्के बेड आरक्षित ठेवण्याचे धोरणही आखले आहे. याबरोबरच महापालिकेकडून सध्या होम आयसोलेशनवर (Home isolation) असलेल्या कोविड रुग्णांची तसेच कोविड होऊन गेलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यात येत आहे. महापालिकेने या कामाची जबाबदारी एका एजन्सीवर सोपविली आहे. या एजन्सीने नुकतीच कामाला सुरवात केली आहे. याअंतर्गत या एजन्सीकडून सध्या होम आयसोलेशनवर असलेल्या कोविड रुग्णांची तसेच कोविड होऊन गेलेल्या रुग्णांशी मोबाईलवर संपर्क साधला जात आहे. "कोविड झाल्यावर कुठे उपचार घेतलात, डॉक्‍टरांनी दिलेला कोर्स पूर्ण केला का, सध्या तुम्हाला किडनी व अन्य गंभीर आजार वा दाढ दुखी, नाक गळणे, डोळे लाल होणे असा काही त्रास आहे का? जर असल्यास तुम्हाला तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला हवा आहे का?' असे विविध प्रश्‍न कॉल करणारी व्यक्ती रुग्णांना विचारते.

हेही वाचा: बेळगाव वनखाते सतर्क ; बिबट्याच्या हालचालींवर करडी नजर

या कॉलद्वारे रुग्णांकडून त्यांच्या आरोग्यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच नव्हे तर या एजन्सीकडे तज्ज्ञ डॉक्‍टरवर्ग उपलब्ध आहे. रुग्णांच्या आरोग्यविषयक तक्रारीवर या डॉक्‍टरांकडून ऑनलाइन सल्ला देण्यात येत आहे. एकंदर, कोविडपश्‍चात उद्‌भवणारे आजार, समस्यांवर वेळीच उपाययोजना करण्याचा यामागील हेतू आहे. संबधित नागरिकांनी आरोग्यविषयक खरी माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शहरातील होम आयसोलेशनमधील कोविड रुग्णांची तसेच कोविड होऊन गेलेल्या रुग्णांची महापालिकेतर्फे कॉल सेंटरद्वारे विचारपूस केली जात आहे. या माध्यमातून आरोग्यविषयक तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न आहे.

- डॉ. अरुंधती हराळकर, आरोग्याधिकारी, महापालिका

loading image