Video : सईला गायीचा लळा! आठव्या महिन्यापासून पिते गाईच्या आचळाने दूध

सईला लागला गायीचा लळा! वयाच्या आठव्या महिन्यापासूनच पिते गाईच्या आचळाने दूध
सईला लागला गायीचा लळा! वयाच्या आठव्या महिन्यापासूनच पिते गाईच्या आचळाने दूध
सईला लागला गायीचा लळा! वयाच्या आठव्या महिन्यापासूनच पिते गाईच्या आचळाने दूधCanva
Summary

आई आणि गाई या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे बोलले जाते. त्याचाच प्रत्यय सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळालाय.

सोलापूर : आई आणि गाई या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे बोलले जाते. त्याचाच प्रत्यय सोलापूर (Solapur) जिल्ह्यात पाहायला मिळालाय. माढा (Madha) - करमाळा (Karmala) तालुक्‍याच्या सीमेवर असलेल्या केम (Kem) गावात एका दोन वर्षांच्या चिमुलकलीला तिच्या घरातील कपिला गाईचा लळा लागला आहे. देशी गोवंश जोपासणाऱ्या तळेकर कुटुंबीयातील सई असे या चिमुकलीचे नाव असून, ती वयाच्या आठव्या महिन्यापासून थेट गाईच्या आचळाला तोंड लावून दूध पिते.

सईला लागला गायीचा लळा! वयाच्या आठव्या महिन्यापासूनच पिते गाईच्या आचळाने दूध
पेपरविक्रेत्याला कॅन्सर! मात्र चिमुकल्यांसाठी जगण्याची जिद्द

सई सध्या दोन वर्षांची आहे. विशेष म्हणेज सईबाई ही कपिला गाईला आई म्हणून हाक मारते. त्यामुळे सईला तिचा चांगलाच लळा लागलाय. तळेकर कुटुंबीय हे खिलार गायीचे संगोपन आणि संवर्धन करणारे गोसेवक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच सईला गाईच्या आचळातून दूध पिण्याची सवय लागल्याचे तिचे आजोबा सांगतात. दरम्यान, या व्हिडिओमुळे भारतीय संस्कृतीतील दुर्मिळ झालेले दृष्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

सई व कपिला गाईमधील ममतेबद्दल सांगताना तिचे आजोबा अन्‌ गोसेवक परमेश्वर तळेकर म्हणाले, सई आठ महिन्यांची असताना तिला गाईला पाजण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आले. गाईने तिला शांतपणे पान्हा सोडला आणि सई आईकडे जशी दूध पिते तशी सईला गाईची गोडी लागली. ज्या - ज्यावेळी तिला भूक लागते त्यावेळी ती गाईचे दूध पिते. आमच्या मुक्त गोठ्यामध्ये सर्व गायी एकत्र बसलेल्या असताना सई आत आली की आमची कपिला गाय उठून उभा राहायची आणि शांतपणे पान्हा सोडायची. अक्षरश: हे क्षण आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय आहे. जसे गोकुळामध्ये श्रीकृष्ण गायीचे दूध थेट प्यायचे तशी सई गायीचे दूध पिते. आता सई 26 महिन्यांची झाली. आतापर्यंत चार गायी तिला दूध देत होत्या. आता ती स्वत: जाऊन थेट गायीच्या आचळाने दूध पिते.

सईला लागला गायीचा लळा! वयाच्या आठव्या महिन्यापासूनच पिते गाईच्या आचळाने दूध
अरे व्वा ! कोरोना झाल्यानंतरही आपोआप बरे झाले चिमुकले

गायीच्या दुधामुळे सईची शारीरिक वाढ इतर बाळांपेक्षा चांगली आहे. तिला चालता लवकर आले व बोलताही लवकर आले. तिच्या बोलण्यातील उच्चारही स्पष्ट आहेत. तिची बुद्धी तल्लख आहे. आम्ही गायींना सांभाळत नाही तर आमच्या देशी गायीच आम्हाला सांभाळताहेत.

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये/सचिन बिचितकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com