दहिगावच्या पाण्यावरून शिंदे-पाटील यांच्यात चिखलफेक !

दहिगावच्या पाण्यावरून शिंदे-पाटील यांच्यात चिखलफेक !
दहिगावच्या पाण्यावरून शिंदे-पाटील यांच्यात चिखलफेक !
दहिगावच्या पाण्यावरून शिंदे-पाटील यांच्यात चिखलफेक !Canva

दहिगाव उपसा सिंचन योजनेवरून काही दिवसांपासून आमदार संजय शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात चांगलेच राजकारण पेटले आहे.

करमाळा (सोलापूर) : माजी राज्यमंत्री स्व. दिगंबरराव बागल यांनी दहिगाव उपसा सिंचन योजना युती शासनाच्या काळात मंजूर करून घेतली. त्यानंतर माजी आमदार नारायण पाटील (Former MLA Narayan Patil) यांनी 17 वर्षे रखडलेल्या या योजनेचे काम पूर्ण करून ही योजना सुरू केली आणि आता विद्यमान आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांनी 342 कोटींची सुप्रमा मंजूर करून घेतली; या तिन्ही घटना कोणीही नाकारू शकणार नाही. मात्र 342 कोटींची सुप्रमा मंजूर होताना आमदार संजय शिंदे यांनी थेट माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. (The water of Dahigaon scheme in Karmala taluka is beginning to rise in political issue-ssd73)

दहिगावच्या पाण्यावरून शिंदे-पाटील यांच्यात चिखलफेक !
'उजनी'ची प्लसकडे वाटचाल! दौंडमधून साडेआठ हजार क्‍युसेकचा विसर्ग

आमदार शिंदे यांनी सांगितले, "की नारायण पाटील यांच्या काळात दहिगावसाठी निधीच आला नाही. मग हे पाणीदार आमदार कसे?' यावर नारायण पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट अर्थसंकल्पाच्या प्रती दाखवत आणलेल्या निधीचे पुरावे सादर केले आणि आपण 17 वर्षे रखडलेली दहिगाव उपसा सिंचन योजना कशी पूर्ण केली, हे सांगितले. तालुक्‍यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात असे चांगलेच राजकारण पेटले आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे दहिगाव योजनेच्या पाण्याला चांगला राजकीय रंग चढू लागला आहे.

1996 पासून करमाळा तालुक्‍याच्या (Karmala Taluka) राजकारणात दहिगाव सिंचन योजनेचे राजकीय भांडवल करणे सुरू झाले. ही योजना रखडली आणि अलीकडच्या काळात सुरूही झाली. मात्र अद्यापही या योजनेचे राजकीय भांडवल होणे थांबताना दिसत नाही. उलटपक्षी योजना रखडलेली असताना तरी एकमेकांवर कमी आरोप होत होते; आता मात्र आरोप- प्रत्यारोपांनी सीमा गाठली आहे. 17 वर्षे रखडलेली योजना तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी सुरू केली, हे नाकारून चालणार नाही. ही योजना सुरू केल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या भागातून नारायण पाटील यांना भरभरून मतदानही झाले. 2019 ला पाटील यांचे या भागातून वाढलेले मतदान हा नेमका कळीचा मुद्दा आहे. जर येणाऱ्या निवडणुकीत नारायण पाटील यांचे मताधिक्‍य कमी करायचे असेल, तर श्री. पाटील यांच्या काळात दहिगाव योजना सुरू झाली, हे पुसून टाकले पाहिजे, नाही तर लढाई काट्याचीच आहे, यासाठीच तर शिंदे समर्थकांची ही सर्व उठाठेव सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेवरून कलगीतुरा रंगत आहे.

दहिगावच्या पाण्यावरून शिंदे-पाटील यांच्यात चिखलफेक !
सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

संजय शिंदे व नारायण पाटील यांच्यात श्रेयवादासाठी चढाओढ लागलेली असताना, या कालावधीत आमदार झालेले माजी आमदार जयवंतराव जगताप (Former MLA Jayawantrao Jagtap) व माजी आमदार श्‍यामल बागल (Former MLA Shyamal Bagal) मात्र गप्प आहेत. दहिगावशिवाय तालुक्‍यात अनेक अडचणी आहेत. यासाठी आजी - माजी आमदारांनी प्रयत्न केले पाहिजेत. जो विकास करेल त्याच्या पाठीशी जनता नक्कीच उभी राहील. मात्र सर्वच गटांच्या नेत्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा करमाळा तालुक्‍यातील जनता ठेवून आहे. एका दहिगाव योजनेवरच गेली 25 वर्षे राजकारण फिरते आहे; पण याशिवायही कुकडीच्या पाण्यासाठी मांगी तलाव आणि दहिगावच्या पाण्यासाठी वडशिवणे आसुसलेला आहे, याचेही भान आजी - माजी लोकप्रतिनिधींनी ठेवावे.

आदिनाथविषयी शिंदे व पाटील गप्प का?

दहिगाव योजनेसाठी आमदार संजय शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांच्यातील श्रेयवादाची लढाई टोकाला पोचली आहे. याचे श्रेय शेतकरी कोणाला द्यायचे ते ठरवतीलच. पण हीच दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू झाल्याने या पट्ट्यात तीन ते चार हजार हेक्‍टर उसाची लागण झाली आहे. हा ऊस गाळपसाठी चालू हंगामात शेतकऱ्यांना कारखानदारांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. तालुक्‍याची अस्मिता असलेला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद आहे; यावर मात्र सर्व गप्प का? असा प्रश्न तालुक्‍याला पडला आहे. आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठीची प्रक्रिया अडकली आहे (विशेष म्हणजे हा कारखाना पवार भाडेतत्त्वावर घेत आहेत). आजी - माजी आमदारांना दहिगाव उपसा सिंचन योजनेची एवढी काळजी वाटते तर तालुक्‍याची अस्मिता असलेल्या आदिनाथविषयी काही बोलत नाहीत, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. बाहेरील 25 कारखाने तालुक्‍यातील ऊस घेऊन जातात, पण तालुक्‍यातील ऊस गाळला जाईल हेही यांनी पाहिले पाहिजे. फक्त राजकीय सोयीसाठी कोणी आदिनाथकडे दुर्लक्ष केले तर तेही तालुका विसरणार नाही, याची जाणीव या नेतेमंडळीनी ठेवावी.

दहिगावच्या पाण्यावरून शिंदे-पाटील यांच्यात चिखलफेक !
माजी महापौर सपाटेंविरुद्ध 'या' कारणामुळे फसवणुकीचा गुन्हा!

थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क; पण उपयोग काय?

माजी आमदार नारायण पाटील यांचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याशी संपर्क आहे. ते आदिनाथ कारखान्यासाठी मदत मिळावी म्हणून का प्रयत्न करत नाहीत आणि आता विद्यमान आमदार संजय शिंदे यांच्या शब्दाला शासन दरबारी मान आहे, त्यांचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) खाली पडू देत नाहीत मग आमदार शिंदेही आदिनाथविषयी गप्प का? बागल गटाकडे सलग सत्ता देऊनही आदिनाथ भाडेतत्त्वावर देण्याचे ते समर्थन करतात, तर माजी आमदार जयवंतराव जगताप हेही आदिनाथविषयी सध्या तरी ब्र शब्द काढत नाहीत, अशीही तालुक्‍यात चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com