esakal | पतीच्या निधनानंतर 33 वर्षीय पत्नीची आत्महत्या; मंगळवेढयातील दाम्पत्याचा करुण अंत
sakal

बोलून बातमी शोधा

 Suicide

या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोलापूर: पतीच्या निधनानंतर 33 वर्षीय पत्नीची आत्महत्या

sakal_logo
By
हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा (सोलापूर): उपचारादरम्यान पतीच्या झालेल्या निधनाचे दुःख सहन न झाल्यामुळे पत्नीनेही सोलापुरात रेल्वे खाली उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर घडली आहे. मृत दोघेही मंगळवेढा तालुक्यातील शरद नगर येथील आहेत. आप्पासो रावसाहेब कोरे (वय.38 ) पतीचं तर अनुसया आप्पासो कोरे( वय.33 ) असे पत्नीचे नाव आहे.

हेही वाचा: मंगळवेढा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; पिकांचे नुकसान

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या आठ दिवसापूर्वी मयत आप्पासो कोरे याला निमोनिया सदृस्य आजार झाल्यामुळे सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यामुळे अप्पासो कोरे हे आज पहाटे 5 च्या सुमारास मृत झाले. पतीच्या निधनाचा धक्का पत्नी अनुसया यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या केली. पतीच्या उपचारादरम्यान केलेला खर्च व वाचण्यात आलेले अपयश यामुळे भविष्यातील जगण्याविषयी आधार हरपल्यामुळे मानसिक धक्का सहन न झाल्याने पतीबरोबर तीनेही जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा: सत्तेत असूनही होईनात कामे! मंगळवेढा 'राष्ट्रवादी' बैठकीत नाराजी

कोरे दाम्पत्याना एक पाच वर्षाचा मुलगा असून या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी प्रल्हाद चव्हाण हे करीत आहेत. आप्पासाहेब कोरे यांच्या आई-वडिलांसह भावडांचे यापूर्वीच निधन झाले असल्यामुळे पती पत्नी व मुलगा असे असलेले कुटुंबात वडिलांचा आजार आईची आत्महत्या यामुळे पाच वर्षाच्या चमकल्या समोर आता अंधार निर्माण झाला आहे.

loading image
go to top