बावची, सलगर खुर्दमध्ये लांडग्याचा थरार! नऊजण जखमी

file photo
file photo
Summary

किरकोळ जखमी झालेले नागरिक उपचारासाठी जाणार असल्याची माहिती नातेवाईकाकडून मिळाली.

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील बावची व सलगर खु परिसरामध्ये काल (शनिवारी) दुपारी चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत लांडग्याने (wolf) थरार माजवल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान लांडग्याने केलेल्या हल्ल्यात 9 नागरिकासह कुत्र्यांना जखमी केल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (The wolf has been roaming in the area of ​​Bawchi and Salgar since Saturday)

file photo
लस घेतल्यानंतर शरीराला नाणी चिकटण्याची घटना घडली पंढरपुरातही

तालुक्‍याच्या दक्षिण भागामध्ये लांडग्यांचा प्रभाव असून हे लांडगे वनक्षेत्र सोडून बाहेर येवून शेळ्या, बकऱ्या व मेंढ्यावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत असतानाच त्यांनी नागरिकावर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या भीतीचे वातावरण या परिसरात निर्माण झाले आहे. बहुतांश वनक्षेत्राला तारेचे संरक्षक कंपौंड नसल्यामुळे एका लांडग्याने संरक्षण क्षेत्र सोडून बाहेर प्रवेश करत शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून बावची परिसरातील लोकांना चावा घेत जखमी केले आहे तर काहीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर लांडग्याने आपला मोर्चा सलगर खुर्द गावाकडे वळविला.

file photo
पंढरपुरात अज्ञाताचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या खडतरे कुटुंबीयांना जखमी केले मात्र हा थरार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत येथील नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे नागरिकांनी शेवटी पोलिसांची मदत घेतली. पोलीस रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी रुग्णांना उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यासाठी सहकार्य केले. किरकोळ जखमी झालेले नागरिक उपचारासाठी जाणार असल्याची माहिती नातेवाईकाकडून मिळाली.

file photo
मंगळवेढा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरव्दारे थेट वीज पुरवठा

जखमींमध्ये यश राजाराम फोंडे (वय 15), सुखदेव सिध्दू जाधव (वय 60), तानाजी श्रीरंग चव्हाण (वय 30), पार्वती इराप्पा माळी (वय 28) हे सर्व रा. बावची, आईकडे आलेल्या अनुसया माळी (वय 35) रा. लवंगी, जयहिंद तुकाराम खडतरे (वय 37), अक्षय जयहिंद खडतरे (वय 12), संगिता जयहिंद खडतरे (वय 30), तुकाराम खडतरे (वय 75), रा. सलगर खु हे जखमी असून त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. सदरचा लांडगा पिसाळलेला असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे असून त्या लांडग्याला सलगर खुर्द परिसरामध्ये मारण्यात आल्याचे देखील माहिती मिळत आहे.

file photo
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये राबवणार पंढरपूर-मंगळवेढा पॅटर्न !

लांडग्यामुळे काल रात्री उशिरापर्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत वन विभागाला कल्पना दिली होती. त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नसल्यामुळे जखमींच्या संख्येत वाढ झाली. वन्यजीव प्राणी त्यांच्या परिसरांमधून बाहेर न येण्याबाबतची खबरदारी वन विभागाने घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- दत्तात्रय येडवे, बावची

(The wolf has been roaming in the area of ​​Bawchi and Salgar since Saturday)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com